कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगर विभागाची बाजी, पुणे जिल्हा क्रीडा विभाग उपविजेता
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत (मुले) अहिल्यानगर क्रीडा विभागाने विजेतेपद पटकावले, तर पुणे जिल्हा क्रीडा विभागाला दुसरा क्रमांक मिळाला.
आळेफाटा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत (मुले) २०२६-२७ मध्ये अहिल्यानगर क्रीडा विभागाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. पुणे जिल्हा क्रीडा विभागानेही उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.
दोन दिवस चाललेली ही स्पर्धा चांगलीच रंगली. खेळाडूंनी चपळता, ताकद, जिद्द आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.
बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३ व ४ नोव्हेंबर रोजी आळे येथील बोरी रोडवरच्या अथर्व मंगल कार्यालयात सामने खेळवण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शुभम पठारे, भारतीय रेल्वेचे बारामती येथील स्टेशन मॅनेजर प्रशांत पाटील, तसेच संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याचवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सहसंचालक डॉ. सुदाम शेळके आणि विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. रमेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित होते.
स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा विभागांतील संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि उत्कृष्ट बचाव दाखवला, त्यामुळे स्पर्धेतील सामने चुरशीचे झाले. अखेर सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळाच्या जोरावर अहिल्यानगर क्रीडा विभागाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर पुणे जिल्हा क्रीडा विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव, शारीरिक शिक्षण संचालक कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड, प्रा. संजय वाकचौरे, लेफ्टनंट शशिकांत भगत, मेजर डॉ. सुषमा कदम आणि डॉ. केशव बोरकर यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर आणि खजिनदार अरुण हुलवळे उपस्थित होते. संचालक किशोर कुऱ्हाडे, भाऊ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे आणि शांताराम कुऱ्हाडे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्यही उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.