पुण्यातील महाळुंगेत नववीतल्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, सहलीतल्या व्हिडिओवरून वाद
बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाळुंगे गावात आज दुपारी एका अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला झाला. मुलगी जखमी असून तिची प्रकृती स्थिर आहे. नववीत शिकणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या महाळुंगे गावात आज दुपारी एका अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.
शाळकरी मुलांमध्ये घडत असलेल्या काही घटना चिंताजनक आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्याने किंवा रिल्स पाहून काही गंभीर घटनांचे अनुकरण केले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निमित्ताने हाच मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाळुंगे गावातील एका शाळेची सहल 17 आणि 18 ऑक्टोबरला पाचगणी आणि महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीत एका कार्यक्रमादरम्यान मुली डान्स करत होत्या. त्या वेळचा व्हिडिओ इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विधिसंघर्षित बालकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवला होता. या व्हिडिओवरून संबंधित मुलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्या मुलाला हा व्हिडिओ डिलीट करावा लागला होता.
याच गोष्टीचा राग मनात धरून त्या मुलाने आज दुपारी मुलीवर चाकूने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. म्हणजे सहलीतल्या व्हिडिओवरून झालेला वाद या हल्ल्यामागे असल्याचे सध्या सांगितले जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. हल्ला केल्याचा आरोप असलेल्या विधिसंघर्षित बालकाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हा प्रकार एका उच्चभ्रू शाळेतील आहे. जखमी मुलीच्या घरचे उच्च शिक्षित आहेत. दुसरीकडे, हल्ला करणाऱ्या मुलाचे आई-वडीलही उच्चशिक्षित आहेत आणि त्याचे वडील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतात. आपला मुलगा असे काही टोकाचे पाऊल उचलेल, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबे या घटनेमुळे चिंतेत आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.