सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 07:47 IST

मुंढवा जमीन प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या दोन सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटिसा

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी विकास पाटील आणि राम चौबे यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा पाठवल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंढवा जमीन प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या दोन सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटिसा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या दोन सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा पाठवल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार यांना यामुळे मोठा झटका बसला आहे, असं बोललं जात आहे. आता या नोटिसांना ते दोघे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ज्यांना नोटिसा गेल्या आहेत, त्यांची नावं विकास पाटील आणि राम चौबे अशी आहेत. हे दोघेही सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दोघेही शासकीय अधिकारी आहेत. पवार कुटुंबाच्या वैयक्तिक तसंच राजकीय कामांमध्येही हे दोघे सक्रिय असतात, असं सांगितलं जातं. मुंढवा जमीन प्रकरणात या दोघांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, हे दोघे सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.

मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमिनीच्या व्यवहारात या दोघांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे. हे प्रकरण पार्थ पवार यांच्या 'अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी' कंपनीशी संबंधित आहे. ज्या वेळी हे प्रकरण उघडकीस आलं, त्या वेळी राम चौबे आणि विकास पाटील हे अजित पवार यांचे पीए म्हणून काम करत होते. आता आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात दोघांची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या दोघांनी पार्थ पवार यांना मदत केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी याआधीच केला आहे. या घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय पातळीवर मदत करण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणांच्या हाती या दोघांचे व्हॉट्सॲप चॅट आणि इतर पुरावे लागले आहेत. राम चौबे आणि विकास पाटील यांनी या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांशी केलेलं व्हॉट्सॲप चॅटिंग उघड झालं आहे. याच चॅटिंगच्या आधारावर त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. म्हणजेच नोटिसा मिळाल्यानंतर आता या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ