सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा

1 नोव्हेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियात पैसे काढता येणार नाहीत? व्हायरल मेसेजमागचे सत्य काय

1 नोव्हेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियात पैसे काढता येणार नाहीत? व्हायरल मेसेजमागचे सत्य काय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
व्यवसाय PT24 व्यापार डेस्क

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना 1 नोव्हेंबरपासून पैसे काढता येणार नाहीत, असा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मात्र हा मेसेज पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

1 नोव्हेंबर 2026 पासून अनेक नियमांत बदल झाले आहेत. गॅस, दूध, दही अशा अनेक गोष्टींच्या किंमतींत मोठी वाढ झाली असून ग्राहकांना अनेक वस्तूंसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. अशा वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत होते. त्यांच्यावर काही निर्बंध येणार असून त्यांना व्यवहार करता येणार नाहीत, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले होते की, बँकिंग क्षेत्राच्या नियमांत अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. 24 तासांत निर्बंध लादण्यात आले आहेत आणि 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना एटीएम किंवा बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. दिवाळी अगदी तोंडावर असताना बँकेतून पैसे काढता येणार नसल्याचे वाचून सर्वांनाच धक्का बसला आणि अनेकांची झोप उडाली.

सध्या लोकांकडे रोख रक्कम फारशी नसते आणि सर्व पैसे बँकेतच असतात. त्यामुळे मेसेज वाचल्यानंतर काहींनी सर्वात आधी एटीएमकडे धाव घेतली. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी होते आणि नेमक्या त्याच वेळी पैसे काढता येणार नसल्याच्या भीतीने लोक अस्वस्थ झाले.

हा मेसेज बँकेतील काही तांत्रिक घटनांमुळे तयार झाला, असे सांगण्यात आले आहे. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी बँकेच्या 3,897 ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या नोंदी डार्क वेबवर आढळल्या होत्या. बँकेनेही याला दुजोरा दिला होता आणि ही गोष्ट गांभीर्याने घेतली होती.

सायबर सुरक्षेची नोडल संस्था असलेल्या SERT-in मार्फत बँकेने चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान सायबर सुरक्षेच्या तांत्रिक प्रक्रियेत काही गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेट बँकेचे व्यवहारच बंद होणार, अशी अफवा उठली.

या व्हायरल मेसेजनंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने माहिती जारी केली. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की, 1 नोव्हेंबरपासून पैसे काढण्यावर बंदी घातल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.

खातेदार त्यांच्या पैशांचे 100 टक्के व्यवहार करू शकतात, असेही यात सांगण्यात आले आहे. 1 नोव्हेंबरला किंवा त्यानंतरही ग्राहकांना बँकेतील प्रत्येक व्यवहार करता येणार आहे.

#मुंबई#कारोबार#PT24#Business#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ