अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संजय राऊत यांची बोचरी टीका
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील भेटीवरून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका केली आणि इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नुकतीच दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून अनेक चर्चा सुरू आहेत आणि वेगवेगळे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय शहा यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमांत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, अमित शहांनी महाराष्ट्राला दुबळे करण्यासाठी हे गट निर्माण केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही गट काही दिवसांत नष्ट होतील, असे ते म्हणाले. "अमित शहांच्या पायाशी बसता तुम्ही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे अमित शहांनी बांधले. यांना लाज वाटली पाहिजे," असेही राऊत यांनी सांगितले.
जबरदस्तीने नाव आणि चिन्ह दिले गेले, तुम्ही पक्ष चालवू शकत नाही, तुम्ही नेहमी गुडघ्यावरच राहणार, असे राऊत यांनी म्हटले. लवकरच हे पक्ष अस्तित्व गमावून बसतील, असेही ते म्हणाले. अजित पवारांनंतर हा पक्ष अनाथ झाला आहे आणि हा पक्ष शरद पवार यांचाच आहे, असा दावा त्यांनी केला.
"आम्ही कुणाशी चर्चा नव्हे, तर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागतोय," असे राऊत यांनी सांगितले. काल तेलंगणात ते लोकशाही संवर्धनासाठी मोर्चा काढत होते, असे सांगत राऊत म्हणाले की, आम्ही लोकशाहीचा खुनी मोर्चा काढतोय. म्हणजे कुणापासून लोकशाहीचा बचाव व्हावा, असा सवालही त्यांनी केला.
रेझिम चेंजच्या जयप्रकाश यांच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांचे वडील सहभागी होते, असे राऊत यांनी सांगितले. "तुम्ही कोण ठरवणार, आम्ही ठरवणार रेझिम चेंज. फडणवीस यांना रक्त कमी पडले तर रक्तदान शिबीर ठेवू. त्यांना रक्ताची गरज पडणार नाही. पण रेझिम चेंज करू," अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.
"मोदी दिल्लीत राहतील पण तिहार जेलमध्ये जातील," असे राऊत म्हणाले. चिनी कंपन्यांकडून 1714 कोटी पीएम केअर फंडात आले आणि त्याबदल्यात तुम्ही अरुणाचल आणि लडाखची जमीन दिली, असा दावा त्यांनी केला. चिनी कंपन्यांकडून 911 कोटी तुमच्या पार्टी फंडात आले, असेही ते म्हणाले. "त्यांचा मेंदू सडलाय," असे राऊत यांनी म्हटले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला तुम्ही अराजकता म्हणाल का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. अन्यायाविरोधात लढा देणे म्हणजे अराजकता नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.