iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
मुंबई आणि दिल्लीतील Vi ग्राहकांना iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max साठी खास प्री-बुकिंग सुविधा, फोन उपलब्धतेवर आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य
नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max घ्यायचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वाट पाहावी लागू शकते. विविध रिपोर्ट्सनुसार नव्या ऑर्डर्ससाठी डिलिव्हरीची वेळ थेट सप्टेंबर अखेरपासून ऑक्टोबरपर्यंत लांबली आहे. यावरून या 'प्रो' मॉडेल्सना बाजारात किती मागणी आहे हे स्पष्ट होतं. लाँचिंगच्या पहिल्या दिवशी हे फोन मर्यादित संख्येतच मिळणार असल्याचं दिसतंय, म्हणजेच जे ग्राहक थोडे उशीर करतील त्यांना बरीच वाट पाहावी लागू शकते.
मात्र मुंबई आणि दिल्लीतील Vi ग्राहकांसाठी ही वाट लवकर संपवण्याची संधी आली आहे. या दोन्ही शहरांमधील ग्राहकांसाठी Vi ने खास ऑफर आणली असून, जागतिक लाँचिंगच्या तारखेप्रमाणे म्हणजेच शुक्रवार १८ सप्टेंबरपासूनच नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची 'एक्सप्रेस डिलिव्हरी' दिली जाणार आहे. म्हणजे इतर ग्राहकांना जिथे ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते, तिथे Vi च्या या ऑफरचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना लाँचिंगच्या दिवशीच फोन मिळेल.
यासाठी Vi ने आपल्या ग्राहकांसाठी सगळ्यात नवीन iPhone 18 Pro मॉडेल्सचं प्री-बुकिंग आधीच सुरू केलं आहे. ग्राहक मुंबईतील निवडक Vi स्टोअर्स किंवा 'आयप्लॅनेट' आऊटलेट्सवर, तसंच दिल्लीतील 'आयवीनस' आऊटलेट्सवर जाऊन पाच हजार रुपयांपर्यंतची बुकिंग रक्कम भरून आपल्या आवडत्या iPhone 18 Pro किंवा iPhone 18 Pro Max ची प्री-बुकिंग करू शकतात. जे ग्राहक ही प्री-बुकिंग प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांना लेटेस्ट iPhone 18 Pro खरेदी करता येईल आणि १८ सप्टेंबरपासूनच फोन हातात मिळेल.
या प्री-बुकिंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना लांब रांगेत उभं राहावं लागणार नाही. सामान्यपणे नवीन आयफोन आल्यावर स्टोअर्सबाहेर रात्रीपासून रांगा लागतात, पण या ऑफरमध्ये निवडक Vi स्टोअर्समध्ये सगळ्यात नवीन आयफोन मॉडेल्स सहज आणि पटकन मिळतील. 'मेपल' आणि 'इझीऑझी' यांच्या सहकार्याने ही ऑफर Vi स्टोअर्ससोबतच मुंबईतील 'आयप्लॅनेट' आणि दिल्लीतील 'आयवीनस' या पार्टनर आऊटलेट्सवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन iPhone घेताना जुना फोन एक्सचेंज करण्याची सुविधाही या ऑफरमध्ये आहे. ग्राहक आपलं जुनं डिव्हाइस एक्सचेंज करून मेपल पॉवर्ड Vi स्टोअर्स, आयप्लॅनेट आणि आयवीनसमध्ये चांगलं एक्सचेंज मूल्य मिळवू शकतात. यासोबतच पात्र ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा जास्तीचा एक्सचेंज बोनसही मिळू शकतो, म्हणजे जुना फोन देऊन नवीन फोनच्या किमतीत बरीच बचत होऊ शकते.
ही सगळी ऑफर 'आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य' या तत्त्वावर चालणार आहे आणि फोनची उपलब्धता यावरच अवलंबून राहील. त्यामुळे ज्या ग्राहकांना आपला नवीन आयफोन प्रो मॉडेल लवकरात लवकर हवा आहे, त्यांनी लवकर प्री-बुकिंग करून घेणं फायद्याचं ठरेल.