रस्त्यावर पडलेल्या पाच वस्तू घरी आणू नका, वास्तुशास्त्रात सांगितलेली समजूत
रस्त्यात सापडलेल्या काही वस्तू घरी आणल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आपल्याकडे वास्तुशास्त्राला खूप मानले जाते. घर कसे बांधायचे, दरवाजा कुठे ठेवायचा, किचन कुठे असावे, हे अनेक जण वास्तुशास्त्र बघून ठरवतात. घरात चांगली ऊर्जा राहावी आणि सगळे चांगले घडावे, असे सगळ्यांनाच वाटते.
पण कधी कधी नकळत आपल्या हातून काही चुका होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते, असे सांगितले जाते. त्यामुळे घरात वाद होतात, पैसा टिकत नाही आणि कामात अडचणी येतात. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, रस्त्याने चालताना काही वस्तू पडलेल्या दिसतात आणि आपण त्या उचलून घरी आणतो. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. रस्त्यावर पडलेली प्रत्येक वस्तू घरी आणू नये, असे शास्त्रात सांगितले आहे.
रस्त्यावरच्या वस्तू का आणू नयेत? रस्त्यावर सगळ्या प्रकारच्या लोकांची ये-जा असते. तिथे चांगली ऊर्जाही असते आणि वाईट ऊर्जाही असते. रस्त्यावर पडलेल्या वस्तूवर त्या सगळ्या ऊर्जेचा परिणाम झालेला असतो. काही वस्तू कुणीतरी मुद्दाम टाकलेल्या असतात, तर काही पूजा-विधीच्या असतात. अशा वस्तू उचलून घरी आणल्या तर त्यांची वाईट ऊर्जाही घरात येते. मग विनाकारण घरात वाद-भांडण होतात आणि पैशाची अडचण येते. म्हणून रस्त्यात काहीही पडलेले दिसले तरी ते उचलण्याची घाई करू नका.
पहिली वस्तू म्हणजे पूजेचे सामान. रस्त्यावर कधी कधी फुले, हार, नारळ, कुंकू लावलेले लिंबू अशा वस्तू पडलेल्या दिसतात. चौकात तर असे बरेच काही ठेवलेले असते. या वस्तूंना चुकूनही हात लावू नका. कोणीतरी आपल्या घरातली संकटे दूर करण्यासाठी त्या रस्त्यावर टाकलेल्या असतात. त्या तुम्ही घरी आणल्या तर त्यांचे संकट तुमच्या घरात येऊ शकते, असे मानले जाते.
दुसरी म्हणजे तुटलेले दागिने किंवा लोखंड. रस्त्यात एखादे तुटलेले कानातले, लोखंडाची वस्तू, सुई किंवा खिळा सापडला तर तो घरी आणू नका. वास्तुशास्त्रानुसार तुटक्या वस्तू घरात ठेवल्याने वास्तुदोष लागतो. तुटक्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते, म्हणून अशी वस्तू दिसली तरी तिथेच सोडून द्या.
तिसरी म्हणजे केस किंवा कंगवा. कधी कधी रस्त्यात केसांचा गुच्छ किंवा कंगवा पडलेला दिसतो. अशी वस्तू अजिबात घरी आणू नये. केसांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते.
चौथी म्हणजे पैसे किंवा नाणी. सगळ्यात जास्त लोक हीच चूक करतात. रस्त्यावर पैसे पडलेले दिसले की लोक लगेच उचलतात. पण वास्तुशास्त्र म्हणते की रस्त्यावरचे पैसे उचलल्याने लक्ष्मी नाराज होते. ते पैसे कोणीतरी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी टाकलेले असू शकतात. ते उचलून तुम्ही त्यांची अडचण आपल्याकडे घेत असता.
पाचवी म्हणजे कपडे. रस्त्यावर पडलेले कपडे, विशेषतः काळे किंवा फाटलेले कपडे चुकूनही घरी आणू नयेत. त्यावर वाईट नजर असू शकते.
थोडक्यात, रस्त्यावरची कोणतीही वस्तू, ती कितीही चांगली किंवा महागडी वाटली तरी घरी आणू नका. तुमच्या घराची सुख-शांती जास्त महत्त्वाची आहे. धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई अशा विषयांवरील लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.