सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:56 IST

वाशिममध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, कृषी विभाग आणि आत्माचा उपक्रम

वाशिम येथे कृषी विभाग आणि आत्मा यांनी 'शेती वाचवा अभियान'अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेतला.

वाशिममध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, कृषी विभाग आणि आत्माचा उपक्रम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वाशिम, 24 ऑक्टोबर : हवामान सतत बदलत आहे. अशा वेळी शेती जास्त टिकाऊ, जास्त उत्पादन देणारी आणि परवडणारी करायची असेल, तर सुधारित कृषी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. म्हणूनच कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांनी मिळून 'शेती वाचवा अभियान'अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. गळीतधान्य पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि पीक व्यवस्थापन हे या कार्यक्रमाचे मुख्य विषय होते.

वाशिम येथील काटा रोडवरच्या स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम झाला. शेतीशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मातीच्या आरोग्याची जपणूक, गळीतधान्य पिकांचे उत्पादन वाढवणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे व्यवस्थापन सुधारणे यावर विशेष भर देण्यात आला.

उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी उन्नत कृषी तंत्रज्ञान, शून्य मशागत शेती, अॅग्री स्टॅक आणि महाविस्तार अभियान या विषयांवर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान वापरणे, शेती व्यवस्थापन सुधारणे आणि शेतीशी संबंधित डिजिटल सुविधांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सविस्तर सांगितले.

जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी अनिल राठोड यांनी मृदाआरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खते कशी वापरावीत, यावर मार्गदर्शन केले. जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर माती परीक्षणाच्या आधारेच खते द्यावीत आणि पिकांच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी गळीतधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान आणि पीक व्यवस्थापन, तसेच स्थानिक परिस्थिती आणि हवामान बदलाला साजेसे कृषी तंत्रज्ञान या विषयांवर माहिती दिली. बदलत्या हवामानात पिकांचे योग्य नियोजन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, सुधारित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक उपाय यांचे महत्त्व त्यांनी सांगितले. सोयाबीन बियाण्यांची साठवण कशी करावी, याबाबतही त्यांनी माहिती दिली.

प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी 'शेती वाचवा अभियान'ची उद्दिष्टे सांगितली. तसेच या अभियानांतर्गत कोणते उपक्रम राबवले जात आहेत, याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय मोरे यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप झाले आणि अभिप्राय सत्र घेण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, सुधारित शेती पद्धतींचा प्रसार करणे आणि कृषी विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे यावर या कार्यक्रमात भर होता. कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित, परवडणारी आणि टिकाऊ शेती करावी, यासाठी असे मार्गदर्शनपर उपक्रम राबवले जात आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ