सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:56 IST

वाशिममध्ये घरफोडीच्या आरोपाखाली दोघांना अटक; ६.२५ लाखांचा ऐवज पोलिसांकडे

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय चड्डी-बनियन टोळीतील दोघांना अटक केली. सात घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

वाशिममध्ये घरफोडीच्या आरोपाखाली दोघांना अटक; ६.२५ लाखांचा ऐवज पोलिसांकडे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वाशिम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या आंतरराज्यीय चड्डी-बनियन टोळीतील दोघांना वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

माहितीनुसार, चड्डी-बनियन घालून आणि हातात धारदार शस्त्रे घेऊन चोऱ्या करणाऱ्या या टोळीची वाशिम जिल्ह्यात मोठी दहशत निर्माण झाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. यात बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (वय २७, रा. विरेगाव, ता. जि. जालना) आणि संजय मारुती शिंदे (वय ३५, रा. विरेगाव, ता. जि. जालना) या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा आणखी एक साथीदार निष्पन्न झाला आहे.

हे आरोपी सतत राहण्याचे ठिकाण बदलत होते आणि मोबाइलही वापरत नव्हते. त्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. तरीही पथकाने रात्रंदिवस रस्त्यांवर पाळत ठेवली आणि शनिवारी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान मालेगाव, रिसोड, अनसिंग, वाशिम शहर, लोणार आणि चिखली (जि. बुलढाणा) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. उघड झालेल्या गुन्ह्यांपैकी मालेगाव पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांत चोरीला गेलेल्या मालापैकी ४१ ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे आणि मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सपोनि योगेश धोत्रे, सपोनि पांडुरंग इंगळे, तसेच पोलीस कर्मचारी गजानन झगरे, अशिष बिडवे, अमोल इरतकर, दीपक घुगे, संतोष वाप, अशोक कोठुळे आणि सुनील तायडे यांनी ती पार पाडली.

या आरोपींवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ