मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:25 IST

वर्ध्यात पशुधन व्यवसाय वाढीसाठी एकदिवसीय कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वर्ध्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि BLAMP फेडरेशनतर्फे पशुधन आधारित व्यवसायांवर कार्यशाळा घेण्यात आली, ज्यात शेळी खरेदी, पशुखाद्य नियोजन आणि शासकीय योजनांवर चर्चा झाली.

वर्ध्यात पशुधन व्यवसाय वाढीसाठी एकदिवसीय कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्ध्यातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयात सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत एक दिवसाची कार्यशाळा पार पडली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा वर्धा आणि भारत लाईव्हस्टॉक अँड मार्केटिंग प्रोड्युसर कंपनी (BLAMP) फेडरेशन, नागपूर यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

पशुधन आधारित FPC आणि BLAMP फेडरेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये शेळी खरेदी व संकलन, पशुखाद्याची गरज व त्याचे नियोजन, पशुधन आरोग्य शिबिर, संकलन केंद्र, मांस विक्री केंद्र, मूल्यवर्धित उत्पादने व त्यांचे विपणन, तसेच शासकीय योजनांचे अभिसरण (Government Scheme Convergence) या मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय ३१ मार्च २०२७ पर्यंतचे व्यवसाय विकास नियोजन, त्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा झाली.

प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय संजय खोपडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक निरज नखाते, जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका प्रतिक मुनेश्वर, जिल्हा व्यवस्थापक विपणन मनीष कावडे, पशुवैद्यक ऋषिकेश दोडेवार, तालुका अभियान व्यवस्थापक-सेलू ओमलता दरने, BLAMP संस्थेचे सीईओ दत्तात्रय चौगुले आणि मार्केटिंग मॅनेजर भूषण खेर्डे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या पशुधन आधारित उपक्रमांना गती देण्यासाठी आणि शेळी खरेदी-विक्रीसाठी जिल्ह्यातील पशुधन आधारित FPC सोबत जोडणी करण्यासाठी या कार्यशाळेत चर्चा करून पुढील कार्यवाही ठरवण्यात आली. पशुधन आधारित काम हे महिलांसाठी मोठा व्यवसाय बनू शकतो, असे मत मांडण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पशुपालन केले जाते आणि त्याला योग्य तांत्रिक सहकार्य देऊन नीट संगोपन केले तर तो व्यवसायाच्या स्वरुपात करता येऊ शकतो. त्याच माध्यमातून FPC शेतकरी उत्पादक कंपनीसोबत जोडून मोठ्या प्रमाणावर व्यवसायाला चालना मिळू शकते. यासाठी संयुक्त उपक्रम राबवणे गरजेचे असून उमेद, भारत लाईव्हस्टॉक अँड मार्केटिंग प्रोड्युसर कंपनी (BLAMP) फेडरेशन नागपूर आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय चौगुले, मार्केटिंग मॅनेजर भूषण खेर्डे आणि उमेदचे CLM मनोज चिखलकर यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील IFC प्रभागातील सर्व प्रभाग समन्वयक, ब्लॉक अँकर, वरिष्ठ सीआरपी तसेच पशुधन आधारित FPC चे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ