फॅमिलीसाठी SUV निवडताना Thar OG, Thar ROXX आणि Scorpio-N मधील फरक जाणून घ्या
महिंद्राच्या तीन SUV मॉडेल्सची रचना वेगवेगळ्या गरजांनुसार करण्यात आली असून, कुटुंबाचा आकार आणि वापराच्या पद्धतीनुसार यातील कोणती गाडी योग्य ठरेल हे समजून घेणे गरजेचे आहे.
महिंद्राच्या SUV लाइनअपमध्ये Thar OG, Thar ROXX आणि Scorpio-N या तीन गाड्यांना वेगवेगळे स्थान देण्यात आले आहे. नुकतीच लाँच झालेली 3-डोअर Thar OG ही Rs 10.32 लाखांपासून सुरू होते. तर 5-डोअर असलेली Thar ROXX ही Rs 12.52 लाखांपासून अवेलेबल आहे. Scorpio-Nमध्ये 6 किंवा 7 सीट्सचा पर्याय मिळत असल्याने मोठ्या कुटुंबासाठी तिची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे.
Thar OG ही साहस आणि ऑफ-रोडिंगला प्राधान्य देणारी 4-सीटर, 3-डोअर SUV आहे. या गाडीत नवीन M_Glyde 4G प्लॅटफॉर्म, Rear PENTALINK सस्पेंशन, Electric Power Steering आणि Electronic Locking Differential यांसारखी अपडेट्स देण्यात आली आहेत. इंजिनच्या बाबतीत 2.0-लिटर पेट्रोल तसेच 1.5-लिटर आणि 2.2-लिटर डिझेल असे पर्याय उपलब्ध आहेत. कुटुंबात 4 जण असतील आणि वीकेंड ट्रिप, डोंगराळ रस्ते किंवा ऑफ-रोडिंग हा वापराचा महत्त्वाचा भाग असेल, तर Thar OGचा कॉम्पॅक्ट आकार उपयोगी पडू शकतो. मात्र मागच्या सीटवर बसण्यासाठी 3-डोअर रचना आणि मर्यादित बूट स्पेस ही रोजच्या फॅमिली वापरातील अडचण ठरू शकते.
Thar ROXX ही फॅमिली आणि अॅडव्हेंचर या दोन्हीचा मिलाफ साधणारी गाडी आहे. यात 5 दरवाजे आणि 5 सीट्स मिळतात. 447-लिटर बूट स्पेस, जास्त केबिन जागा आणि मागच्या प्रवाशांसाठी जास्त वापरण्यायोग्य सीट्समुळे ऑफिस, कुटुंब आणि लांब हायवे प्रवासासाठी ही गाडी अधिक व्यावहारिक ठरते. यात 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल असे इंजिन पर्याय मिळतात, तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 4WD चाही पर्याय उपलब्ध आहे. 4WD व्हर्जनमध्ये Electronic Locking Differential आणि विविध टेरेन मोड्स दिले असल्याने फॅमिली SUV असूनही हिच्या ऑफ-रोड क्षमतेत तडजोड करण्यात आलेली नाही.
मोठ्या कुटुंबासाठी वेगळा पर्याय म्हणून Scorpio-N समोर येते. ही 6 किंवा 7-सीटर SUV असल्याने 5 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबासाठी हिची अतिरिक्त सीटिंग क्षमता महत्त्वाची ठरते. तिसरी सीटची रांग फोल्ड केल्यानंतर Scorpio-Nचा बूट स्पेस 786 लिटरपर्यंत वाढतो. फॅमिली ट्रिप, लांब हायवे ड्राइव्ह आणि जास्त सामान असल्यास Scorpio-Nची मोठी बॉडी उपयोगी पडते. टॉप व्हेरिएंटमध्ये 12.3-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 12-स्पीकर Sony ऑडिओ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि Level-2 ADAS यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.
त्यामुळे कुटुंबातील 5 सदस्यांसाठी रोजच्या वापरासोबत अॅडव्हेंचरचीही आवड असेल तर Thar ROXXची 5-डोअर रचना लक्षात घेण्यासारखी आहे. 6 किंवा 7 प्रवासी आणि जास्त सामानाचा नियमित वापर असेल तर Scorpio-Nची अतिरिक्त सीटिंग क्षमता फायद्याची ठरते. तर 4 जणांचे कुटुंब, ऑफ-रोडिंगची आवड आणि कॉम्पॅक्ट 3-डोअर SUVचा अनुभव हवा असल्यास Thar OGचा वापर वेगळा ठरतो. महिंद्रानेही या तिन्ही मॉडेल्सना वेगवेगळ्या वापराच्या गरजांनुसार स्थान दिले आहे.