टाटा मोटर्सची सिएरा डार्क रेंज बाजारात, किंमत १३.९९ लाखांपासून सुरू
टाटा मोटर्सने प्रीमियम मिड-एसयूव्ही सिएराची डार्क रेंज लाँच केली असून फ्रिजियन ब्लॅक एक्सटीरियर आणि व्हायोलेट इक्लिप्स इंटीरियर ही तिची खासियत आहे.
मुंबई : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने टाटा सिएरा डार्क रेंज लाँच केल्याची घोषणा केली आहे. ही रेंज भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचे एक धाडसी आणि खास रूप आहे. या रेंजची सुरुवातीची किंमत १३.९९ लाख आहे.
सिएरा डार्कमध्ये खास फ्रिजियन ब्लॅक एक्सटीरियर, प्रीमियम व्हायोलेट इक्लिप्स इंटीरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग दिले आहे. सिएराचा वैशिष्ट्यपूर्ण आणि आरामदायी अनुभव तसाच ठेवून या नव्या रेंजला वेगळी आणि खास ओळख दिली आहे.
भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट घडवण्यात सिएराची भूमिका महत्त्वाची आहे. तीच भूमिका पुढे नेत टाटा सिएरा डार्क हे आयकॉनिक नाव आता पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, मोहक आणि खास रूपात समोर आले आहे. सिएराचा सिग्नेचर लूक, रस्त्यावरचे प्रभावी अस्तित्व आणि तिची वैशिष्ट्ये कायम ठेवत ही गाडी टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध डार्क रेंजचा वारसा पुढे नेते. बोल्ड डिझाइन, वेगळे व्यक्तिमत्त्व आणि एक्सक्लुझिव्ह स्टायलिंग यामुळे डार्क रेंजने ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
या लाँचबद्दल बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्सा म्हणाले, "डार्क रेंज आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात लोकप्रिय व्हेरिएंटपैकी एक बनली आहे. एक्सक्लुझिव्हिटी आणि युनिक डिझाइनला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांना ही रेंज आकर्षित करते. भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची सुरुवात करणारी एसयूव्ही म्हणून सिएरा नेहमीच तिच्या आयकॉनिक डिझाइनसाठी आणि प्रभावी अस्तित्वासाठी ओळखली जाते.
श्रीवत्सा यांनी पुढे सांगितले, "सिएरा डार्क दोन महान आयकॉन्सचा वारसा एकत्र आणते. सिएराला प्रसिद्ध बनवणारी तिची वैशिष्ट्ये कायम ठेवत तिला अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण लूक देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या वारशाशी पूर्णपणे एकनिष्ठ असलेली सिएरा डार्क रेंजला खास बनवणारी बोल्ड आणि वैशिष्ट्यपूर्ण भावनाही प्रतिबिंबित करते."
वेगळेपणा आणि स्टाइल यांना महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी सिएरा डार्क तयार करण्यात आली आहे. तिचा संपूर्ण काळा लूक या एसयूव्हीच्या दमदार डिझाइनला, प्रभावी बांधणीला आणि शक्तिशाली रोड प्रेझेन्सला अधिक उठाव देतो. आतल्या बाजूला प्रीमियम काळ्या रंगाची लेदरेट केबिन आरामदायी आणि लाउंजसारखा अनुभव देते. संपूर्ण काळ्या डिझाइनला जांभळ्या रंगाच्या क्रोम ॲक्सेंट्सची जोड दिली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण तपशिलांमुळे सिएरा डार्क नेहमीच्या काळ्या रंगाच्या एसयूव्हींपेक्षा वेगळी ठरते आणि तिला खास ओळख मिळते.
सिएरा डार्क नुकत्याच लाँच झालेल्या सिएरा लेजेंड सिरीजमध्ये मिळते. हे डार्क डिझाइन प्युअर एल, प्युअर एल (ओ), प्युअर + एल आणि ॲडव्हेंचर + एल या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. तसेच टॉप-ऑफ-द-लाइन अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड + व्हेरिएंट्समध्येही ते मिळते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसह आणि सिएराच्या सर्वोत्तम फीचर्ससह ही डार्क एडिशन भारतातील लोकप्रिय प्रीमियम मिड-एसयूव्हीला आणखी आकर्षक आणि प्रीमियम लूक देते.