शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

स्विच बंद केल्यावरही LED बल्ब का चमकतो? यामागची तीन कारणे

स्विच बंद केल्यावरही LED बल्ब का चमकतो? यामागची तीन कारणे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

स्विच बंद असतानाही LED बल्ब मंद उजळत राहतो, कारण अगदी थोडी वीज बल्बपर्यंत पोहोचत असते. वायरिंग, स्विचमधला इंडिकेटर आणि कॅपेसिटर ही त्यामागची कारणे आहेत.

घरातला लाईटचा स्विच बंद केल्यानंतरही LED बल्ब मंद उजळत राहिल्याचं तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? स्विच बंद असला, तरी बल्ब पूर्ण अंधार न करता थोडाफार उजळत राहतो. हे पाहून अनेकदा मनात प्रश्न येतो की, वीज प्रवाह खंडित केल्यानंतरही हा बल्ब कसा काय चालू राहू शकतो? वीज बंद केली असताना असं घडतं, म्हणूनच त्याचं कुतूहल वाटतं.

साधारणपणे स्विच बंद केला की वीज पुरवठा पूर्णपणे बंद होतो, असा आपला समज असतो. पण LED बल्बच्या बाबतीत नेहमीच तसं घडत नाही. स्विच बंद असतानाही अगदी थोड्या प्रमाणात वीज (करंट) बल्बपर्यंत पोहोचत राहते. LED बल्बची रचना इतकी संवेदनशील असते की, तो या अत्यंत कमी विजेवरही मंद प्रकाश देऊ शकतो.

यामागची प्रमुख कारणे तीन आहेत. पहिलं कारण म्हणजे घराची चुकीची वायरिंग. LED बल्ब सतत मंद उजळत राहण्यामागे घरातली वीज जोडणी (Wiring) हे मुख्य कारण असू शकतं. वायरिंग करताना फेज (Phase) आणि न्यूट्रल (Neutral) वायरची योग्य व्यवस्था झाली नसेल, तर स्विच न्यूट्रल वायर कापतो आणि फेज वायरमधून विजेचा हलका प्रवाह सुरूच राहतो. त्यामुळे बल्बपर्यंत वीज पोहोचत राहते.

दुसरं कारण म्हणजे स्विचमधला इंडिकेटर लाईट. आजकाल अनेक घरांमध्ये अंधारातही स्विच सहज लावता यावा म्हणून इंडिकेटर असलेले आधुनिक स्विच वापरले जातात. स्विच बंद केल्यावरही या इंडिकेटरच्या सर्किटमधून थोडी वीज पाझरत राहते. हा क्षीण करंट जेव्हा LED बल्बपर्यंत पोहोचतो, तेव्हा बल्ब मंद उजळू लागतो.

तिसरं कारण म्हणजे कॅपेसिटरमध्ये वीज साठणं. LED बल्बच्या आतल्या सर्किटमध्ये एक कॅपेसिटर असतो, जो थोड्या वेळासाठी वीज साठवून ठेवू शकतो. स्विच बंद केल्यावरही कॅपेसिटरमध्ये साठलेली ऊर्जा पूर्ण संपायला काही सेकंद किंवा मिनिटे लागतात. त्यामुळे बल्ब बंद झाल्यानंतरही काही वेळ चमकत राहतो.

मग हे किती धोकादायक आहे? स्विच बंद केल्यावर बल्ब काही सेकंदांसाठी चमकून बंद होत असेल, तर ती साधी गोष्ट आहे. पण स्विच बंद असूनही बल्ब रात्रभर किंवा सतत मंद उजळत असेल, तर तो वायरिंगमधील बिघाडाचा संकेत असू शकतो.

अशा वेळी घरच्या घरी प्रयोग करत बसू नये. एखाद्या तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून वायरिंगची तपासणी करून घेणं सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरतं. वीज, वायरिंग किंवा घरगुती उपकरणांची कोणतीही अडचण असेल, तर स्वतःहून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये आणि अनुभवी इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ