मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:25 IST

साताऱ्यात १२१ गावांचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

सातारा तालुका पोलिसांच्या पुढाकाराने यंदा गणेशोत्सवाला शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.

साताऱ्यात १२१ गावांचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, रोषणाई आणि जल्लोषाचं वातावरण डोळ्यासमोर येतं. पण यंदा सातारा तालुका पोलिसांनी या उत्साहाला शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाची जाणीव यांची जोड देत गणेशोत्सवाला एक वेगळं, विधायक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा डॉल्बीचा आवाज चांगलाच खाली आलेला दिसतोय.

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १५३ गावं आणि ३८९ गणेशोत्सव मंडळं आहेत. यापैकी तब्बल १२१ गावांनी यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. पोलीस निरीक्षक तांबे यांनी विविध गणेशोत्सव मंडळांना केलेल्या आवाहनाला मिळालेला हा प्रतिसाद जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरला आहे.

याशिवाय एक गाव, एक गणपती हा उपक्रमही यंदा मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील ७१ गावांनी हा उपक्रम राबवला होता, यंदा ही संख्या वाढून ९५ गावांवर पोहोचली आहे. गावागावांत एकच सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सवातील अनावश्यक स्पर्धा, खर्च आणि गर्दी कमी करण्याचा तसंच गावातील एकोपा वाढवण्याचा प्रयत्न यातून होतो आहे.

पोलीस प्रशासनाच्या या जनजागृती मोहिमेला जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि डीवायएसपी विपुल पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. गणेशोत्सवापूर्वी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी विविध गावचे पोलीस पाटील आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांना एकत्र बोलावून डॉल्बीमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समजावून सांगितलं.

सातारा येथे झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी डॉल्बीला चार बेसपर्यंत परवानगी द्यावी अशी भूमिका मांडली होती. त्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी, चार नव्हे त्याहून अधिक बेसलाही परवानगी देऊ, मात्र डॉल्बी जिथे वाजवली जाणार आहे तिथे आधी आपल्या घरातील ज्येष्ठांना आणून बसवा आणि मग डॉल्बी वाजवा असं सांगितलं. हे ऐकताच सभागृहात एकच निरव शांतता पसरली. या प्रसंगाचा अनेक मंडळांतील कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करत डॉल्बीला नो एंट्री केल्याचं समोर आलं.

पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम आता दिसून येतो आहे. शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाने विविध गावांमधील मंडळं, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत केलं होतं, त्याला हा प्रतिसाद मिळाला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ