सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:56 IST

सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या सुजितला अनंत अंबानींकडून बाईक, डोळ्यांत आनंदाश्रू

ऊन, वारा, पाऊस न पाहता सायकलवर ब्लिंकिटचं डिलिव्हरीचं काम करणाऱ्या सुजितला हुसेन मन्सूरी यांच्यामार्फत अनंत अंबानी यांनी बाईक दिली.

सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या सुजितला अनंत अंबानींकडून बाईक, डोळ्यांत आनंदाश्रू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सायकलवरून घरोघरी सामान पोहोचवणाऱ्या एका तरुणाचं नशीब अचानक पालटलं आहे. ब्लिंकिटसाठी (Blinkit) डिलिव्हरीचं काम करणाऱ्या सुजित नावाच्या या तरुणाला बाईक घेऊन देण्यात आली. ही मदत अनंत अंबानी यांच्यामार्फत करण्यात आली, असं हुसेन मन्सूरी यांनी एका व्हिडीओत सांगितलं आहे.

हुसेन मन्सूरी हे गोरगरीब लोकांना नेहमी मदत करताना दिसतात. आपलं हे काम ते आपल्या इन्स्टाग्राम आयडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. यावेळी त्यांनी ब्लिंकिटसाठी डिलिव्हरी करणाऱ्या एका माणसासाठी बाईक विकत घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला.

सुजित ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरीचं काम करतो. अवघ्या १० मिनिटांत किराणा माल पोहोचवणाऱ्या क्विक-कॉमर्स कंपन्यांमध्ये असे हजारो तरुण काम करत असतात. त्यांच्यापैकीच एक असलेला सुजित मात्र ऊन, वारा, पाऊस काहीही न पाहता सायकलवर पायडल मारत लोकांच्या दारापर्यंत वस्तू नेऊन देतो.

बाईक घेण्याची त्याची आर्थिक ताकद नव्हती. तरीसुद्धा त्याने आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा गाडा ओढणं सोडलं नाही. दिवसरात्र सायकल चालवून तो घर चालवत होता. या कष्टकरी तरुणाची मेहनत अखेर अनंत अंबानी यांच्यापर्यंत पोहोचली.

त्याची परिस्थिती कळताच अनंत अंबानी यांनी कोणताही गाजावाजा न करता त्याला ही भेट दिली. सायकलवरून दिवसरात्र फिरून घर चालवणाऱ्या या डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिक मेहनतीची दखल घेत, हुसेन मन्सूरी यांच्यामार्फत त्याला ही अनपेक्षित आणि आयुष्याला कलाटणी देणारी भेट मिळाली. रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एका कष्टकरी तरुणाचं आयुष्य बदलून गेलं.

ही मदत फक्त काही काळापुरती नाही, तर त्या तरुणाचं संपूर्ण आयुष्य आणि आर्थिक परिस्थिती सोपी करणारी ठरली आहे. मदत हातात पडताच डिलिव्हरी बॉयच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, असं व्हिडीओत पाहायला मिळालं.

श्रीमंत होणं ही नशिबाची गोष्ट असते. मात्र दुसऱ्याच्या आयुष्यातलं दुःख ओळखून त्याला आनंदाची अनुभूती देण्यासाठी खूप मोठं मन लागतं. या घटनेतून त्याच संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ