मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
11:13 IST

रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील फिल्डवर, चंद्रशेखर

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मंगळवारी रेशीमबागेत पार पडला. बंदोबस्ताची पाहणी करणारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तिथे भेट झाली.

रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील फिल्डवर, चंद्रशेखर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत संघाचा विजयादशमी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपमधील प्रमुख नेत्यांनी या उत्सवाला हजेरी लावली होती.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिघेही स्वयंसेवकांच्या पूर्ण गणवेशात उत्सवाला उपस्थित होते. या सोहळ्यासाठी रेशीमबागेच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वत: फिल्डवर उतरून या बंदोबस्ताची पाहणी करत होते. त्याच वेळी त्यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाली. दोघे समोरासमोर आल्यानंतर विश्वास नांगरे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे एकमेकांशी बोलले. बावनकुळे यांनी तिथे असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांकडेही जुजबी विचारपूस केली. त्यानंतर ते विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी पुढे रवाना झाले.

संघाकडून यंदाच्या उत्सवासाठी अनेक पाहुण्यांना बोलावण्यात आले होते. त्यांपैकी एक पाहुणे म्हणून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. उत्सवासाठी उभारलेल्या व्यासपीठाचा बॅकड्रॉप सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. मुख्य मंचावर "जय जय गूंजे भारत मां की, उसी के हित में हम जिए मरे" असे लिहिले आहे. म्हणजेच देशहित सर्वात महत्त्वाचे आहे, असा संदेश या ओळींतून मंचावर देण्यात आला आहे. याशिवाय मुख्य मंचावर 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचाही उल्लेख आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्य अतिथी संजय गुप्ता कार्यक्रमस्थळी आले. त्यांचे आगमन झाल्यानंतर ध्वजारोहण आणि शस्त्र पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे यंदा रेशीमबागेत शस्त्र पूजनाच्या ठिकाणी पारंपरिक शस्त्रांबरोबरच संपूर्ण भारतीय बनावटीची अत्याधुनिक कार्बाईनही ठेवण्यात आली होती.

दुसरीकडे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हेदेखील संघाच्या विजयादशमी उत्सवात उपस्थित आहेत. संघाच्या निमंत्रणावरून ते उत्सवाला आल्याची माहिती आहे. संघाच्या शताब्दी वर्षाची सांगता आणि पुढील वाटचालीची दिशा, या दोन्ही दृष्टीने नागपुरातील रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ