मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:49 IST

रेशीमबागेत सरसंघचालक मोहन भागवत यांची स्वयंसेवकांशी गुप्त बैठक, आमदार-नगरसेवकही उपस्थित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील रेशीमबाग भागात निवडक स्वयंसेवकांशी रात्री गुप्त बैठकीत संवाद साधला. या बैठकीला काही आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारीही हजर होते.

रेशीमबागेत सरसंघचालक मोहन भागवत यांची स्वयंसेवकांशी गुप्त बैठक, आमदार-नगरसेवकही उपस्थित
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघ परिवारातील निवडक स्वयंसेवकांशी रात्री महत्वाचा संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील रेशीमबाग परिसरात असलेल्या सुरेशभट सभागृहात ही बैठक पार पडली. ही बैठक पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती, त्यामुळे भागवत यांनी स्वयंसेवकांना नेमकं काय बौद्धिक दिलं याबाबत कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही.

बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ सर्वसामान्य स्वयंसेवकच नव्हते, तर काही निवडक आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने बैठकीत स्वयंसेवकांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सायंकाळी साडेसात वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री साडेआठ वाजता संपली, म्हणजेच एका तासात नेमकं काय झालं याबद्दल राजकीय वर्तुळात सध्या उत्सुकता आहे आणि त्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दुसरीकडे, संघाच्या यंदाच्या विजयादशमी उत्सवाची तारीखही जाहीर झाली आहे. हा पवित्र उत्सव 20 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार असून याच निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं वार्षिक उद्बोधन होणार आहे. संघाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या कार्यक्रमाला दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7.40 वाजता रेशीमबाग, नागपूर इथे हा कार्यक्रम होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकूण सहा उत्सव साजरे केले जातात - वर्षप्रतिपदा म्हणजेच गुडीपाडवा, शिवराज्याभिषेक दिन, रक्षाबंधन, गुरुपौर्णिमा, विजयादशमी आणि मकरसंक्रांती. या प्रत्येक उत्सवामागे संघाचं स्वतःचं तत्त्वज्ञान आहे. नागपुरात होणारा विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची सांगता या दोन्ही कार्यक्रमांना संघात विशेष महत्त्व दिलं जातं.

संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्याच दिवशी संघाची स्थापना केली होती, त्यामुळे हा दिवस संघाचा स्थापना दिनही मानला जातो. याच दिवशी सरसंघचालक स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना संघाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं.

याआधी 5 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या विजयादशमी कार्यक्रमात गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य अतिथी म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. 24 ऑक्टोबर 2023 रोजी रेशीमबाग मैदानावरील कार्यक्रमात गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. 2024 मध्ये इस्रोचे वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन आणि संघाच्या शताब्दी वर्षात, म्हणजे 2025 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या परंपरेत यंदा ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता यांना बोलावण्यात आलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ