शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:23 IST

रत्नागिरीतील कोळंबे येथे क्रिकेटचा सामना संपल्यावर डोहात उतरलेल्या कल्याणच्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून

क्रिकेट स्पर्धेसाठी कल्याणहून आलेल्या सौरभ पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव यांचा बंदी असलेल्या धोकादायक डोहात बुडून मृत्यू झाला. पूर्णगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

रत्नागिरीतील कोळंबे येथे क्रिकेटचा सामना संपल्यावर डोहात उतरलेल्या कल्याणच्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे येथे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर पोहण्यासाठी डोहात उतरलेल्या कल्याण येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौरभ पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी या मुलांची नावे असून दोघेही १६ वर्षांचे होते. पोहण्यासाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या आणि बंदी असलेल्या डोहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षांखालील मुलांचे क्रिकेट सामने सुरू आहेत. या स्पर्धेत खेळण्यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अकॅडमीचा २० जणांचा संघ आला होता. आपल्या संघाचा सामना संपल्यावर दुपारच्या सुमारास सौरभ झा आणि शुभम यादव क्रिकेटच्या मैदानाशेजारी असलेल्या डोहाकडे पोहण्यासाठी गेले. संघातील इतर सहकारीही त्यांच्यासोबत होते.

हा डोह जंगल परिसरात आहे आणि तो अतिशय धोकादायक मानला जातो. तिथे पोहण्यास बंदी असल्याची माहिती आहे. तरीही या धोक्याकडे दुर्लक्ष करून सौरभ आणि शुभम पाण्यात उतरले. दोघांनी डोहात उडी घेतली, पण त्यानंतर ते पुन्हा पाण्याच्या वर आलेच नाहीत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

सोबतच्या मुलांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तो आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्या. डोहात उडी मारताना दगडावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मुलांच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

क्रिकेट खेळण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांचे सहकारी आणि परिसरातील नागरिक शोकाकुल झाले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ