अधिस्वीकृत संपादक व पत्रकार महासभेची स्थापना; अध्यक्ष निलेश भिलारे, सचिव अशोक इथापे
महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती असलेल्या संपादक व पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या महासभेचे अध्यक्ष निलेश भिलारे, तर सचिव अशोक इथापे झाले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती असलेल्या संपादकांचे आणि पत्रकारांचे हक्क, सन्मान व हित जपण्यासाठी 'अधिस्विकृत संपादक व पत्रकार महासभा, महाराष्ट्र राज्य' ही संस्था काम करणार आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी निलेश भिलारे यांची, तर सचिवपदी अशोक इथापे यांची निवड झाली आहे. वाई येथून ही घोषणा करण्यात आली.
शासनाची अधिस्वीकृती मिळालेल्या संपादकांना आणि पत्रकारांना एक संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देणे, हा महासभेचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या व्यावसायिक हक्कांचे रक्षण करणे, पत्रकारितेचा सन्मान व स्वाभिमान जपणे आणि पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, हेही संस्थेचे काम असेल. 'महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि हित जपणारी राज्यव्यापी संघटनात्मक शक्ती!' हे ध्येय समोर ठेवून पत्रकारांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
अध्यक्ष निलेश भिलारे म्हणाले, "महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याचा आमचा संकल्प आहे. पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांचे व्यावसायिक हक्क आणि हितसंबंध यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, तसेच पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, निर्भीडता आणि विश्वासार्हता जपणे, याला आमचे प्राधान्य राहील. राज्यातील अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांनी या संघटनात्मक प्रवासात सहभागी होऊन एकजूट बळकट करावी. पत्रकारांच्या सन्मानासाठी, हक्कांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महासभा सदैव कटिबद्ध राहील."
भिलारे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे काम राज्यभर वाढवण्यावर भर राहणार आहे. पत्रकारांच्या अडचणी, व्यावसायिक समस्या आणि शासकीय पातळीवरील प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबवणे आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे जतन करणे, यासाठी महासभा प्रयत्न करणार आहे.
सचिव अशोक इथापे म्हणाले, "अध्यक्ष निलेश भिलारे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल निश्चितच प्रगतीच्या आणि यशाच्या शिखराकडे होईल. अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांच्या हक्कांसाठी सक्षम व्यासपीठ उभारणे ही काळाची गरज आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या जातील. पत्रकारितेचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक हितांचे रक्षण केले जाईल. सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी सहभागी होऊन संघटनेची ताकद वाढवावी."
पत्रकारितेचा सन्मान, पत्रकारांचा स्वाभिमान आणि पत्रकारांच्या हिताचे संरक्षण या तीन सूत्रांवर आधारित कामातून महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक संपादक व पत्रकारांसाठी सक्षम आणि प्रभावी व्यासपीठ उभारण्याचा संकल्प महासभेने केला आहे.
लवकरच महाराष्ट्रातील विभागीय, तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. या निवडींमधून संघटनेचा राज्यभर विस्तार करून कार्यकारिणी अधिक सक्षम, व्यापक आणि प्रभावी केली जाईल. महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती असलेल्या सर्व संपादकांनी व पत्रकारांनी या संघटनेशी जोडले जाऊन सभासदत्व स्वीकारावे आणि पत्रकारांचे हक्क, सन्मान व हित जपण्याच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.