मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

अजिंठाजवळ मुखपाठ फाट्यावर एसटी बस ट्रेलरवर आदळली, बसमधील २१ प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे निघालेल्या एसटी बसने सोमवारी सकाळी पोकलेन नेणाऱ्या ट्रेलरला मागून धडक दिली. जीवितहानी झाली नाही.

अजिंठाजवळ मुखपाठ फाट्यावर एसटी बस ट्रेलरवर आदळली, बसमधील २१ प्रवासी जखमी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अजिंठा परिसरातील मुखपाठ फाट्याजवळ सोमवारी (दि. २८) सकाळी सुमारे नऊ वाजता मोठा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे निघालेल्या एसटी बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला मागून जोरात धडक दिली. या अपघातात बसमधील २१ प्रवासी जखमी झाले असून बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले.

या एसटी बसचा क्रमांक एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६ असा असून तिच्यातून ४५ प्रवासी प्रवास करत होते. पुण्याहून पहूरकडे पोकलेन घेऊन निघालेल्या ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) बसने मागून ठोकले. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणात मोडला. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बसचे चालक रतन महादेव कोळी यांनी सांगितले की, बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. ट्रेलरचे चालक राजू पार (रा. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) हेही किरकोळ जखमी झाले.

बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांच्या मदतीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोसीन पठाण, फकीरा खान, महेबुब खान, शेख आवेज, महमू खान, काजिम खान, रफीक खान, गफार खान, शेख अजिंज, शंकर ढकरे, भास्कर बिरारे, रवि मगरे आणि मिलिंद बिरारे यांनी मदतकार्य केले.

अपघातानंतर बस आणि ट्रेलर महामार्गावरच उभे राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहोचले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे, डॉ. अमोल गिरी, डॉ. महेश राठोड आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले.

मुखपाठ फाट्यापासून वाघूर नदीच्या पुलापर्यंत महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना आधीच सावध करणारे सूचनाफलक, धोक्याचे इशारे आणि सुरक्षा चिन्हे नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कामाच्या ठिकाणी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जखमींमध्ये अर्जुन हरी कुमावत, साहेबराव रूपचंद धनगर, सचिन दिलीप कांबळे, छाया रामभाऊ पाटील, द्वारकाबाई विश्वनाथ कुमावत, युक्ता जितेंद्र कपाडे, मिराबाई जगन कुमावत, मंगला मनोज कुमावत, वैभवी रामदास काटे, प्रमिला दगडू सोनटक्के, उमा रितेश परदेशी, कृष्णा उमेश परदेशी, शांताबाई लालसिंग परदेशी, मेघा उमेश परदेशी, अब्दुल हमीद अब्दुल रहमान, अमर मनोहर खोचे, रुस्तम तुळशीराम गोंगे, लक्ष्मण शिंदे, हनुमान अशोक बाविस्कर, गोपाल दत्तात्रय फुके आणि लालसिंग बहादूरसिंग परदेशी यांचा समावेश आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ