मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:50 IST

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण जखमी

माण तालुक्यातील वडजल-म्हसवड रस्त्यावर तीन कारचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले.

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण जखमी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

माण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीत वडजल-म्हसवड रस्त्यावर शनिवारी (दि.२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन कारचा भीषण अपघात झाला. एच. पी. पेट्रोलपंपापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. या अपघातात संजय दिनकर पाटील (वय ४८, रा. वडगाव हवेली, ता. कराड; सध्या रा. पलूस, जि. सांगली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील मिळून एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटील एमएच-१० एफए-०६२८ क्रमांकाची स्विफ्ट कार चालवत होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता ते भरधाव वेगात गाडी चालवत होते. याच वेळी त्यांनी तक्रारदार गणेश रामचंद्र जाधव यांच्या एमएच-१० बीएम-३७३५ क्रमांकाच्या इर्टिगा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. इर्टिगा कारला ओव्हरटेक करत पुढे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच-४२ एच-७१२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारला त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर संजय पाटील यांची स्विफ्ट कार इर्टिगा कारच्या पुढील भागावरही जोरात आदळली, त्यामुळे तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात स्विफ्ट कारमधील अर्चना संजय पाटील (वय ३६), हर्षद संजय पाटील (वय १७), अशोक आकाराम सूर्यवंशी (वय ५४), अरुणा अशोक सूर्यवंशी (वय ४३) आणि अंकिता अशोक सूर्यवंशी (वय २१) हे जखमी झाले.

तसेच समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधील गणेश केशव कांबळे (वय ३५), आकाश मोहन कांबळे, विद्या मोहन कांबळे आणि मीनल मोहन कांबळे हे चौघेही जखमी झाले. हे सर्वजण म्हसवड-देवापूर परिसरातील रहिवासी आहेत. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

या घटनेच्या अनुषंगाने गणेश रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गु.र.नं. २७६/२०२६ नोंदवण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यातील आरोपी संजय पाटील यांचाच अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. खाडे (ब.नं. ३७६) करत असून, म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. अपघातानंतरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ