करवा चौथच्या दिवशी मथुरेत पतीने पत्नीला प्रियकरासोबत पकडले, व्हिडिओ व्हायरल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उपवास सोडण्यासाठी पतीच्या आधी प्रियकराकडे गेलेल्या चार मुलांच्या आईला पतीने कुटुंबासह जाऊन पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
उत्तर प्रदेशातील मथुरेत करवा चौथच्या दिवशी घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका विवाहित महिलेने पतीच्या आधी आपल्या प्रियकराकडे जाऊन उपवास सोडल्याचे समोर आले आहे. मात्र पतीला ही गोष्ट कळली आणि त्याने तिला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करवा चौथ (करक चतुर्थी) हा सण विवाहित महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य, चांगले आरोग्य आणि चांगले भविष्य यासाठी साजरा करतात. हा सण प्रामुख्याने उत्तर भारतात, म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत, तसेच पश्चिम भारतातील काही भागांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पतीसाठी वटसावित्रीची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे हा सण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेत चार मुलांची आई असलेली एक महिला भाड्याच्या खोलीत आपल्या प्रियकरासोबत करवा चौथ साजरा करत होती. उपवासाच्या दिवशीच तिने प्रियकराला भेटायला बोलावले, असे सांगितले जाते. तिचा पती आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन तिथे पोहोचला आणि त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. या जोडप्याचे लग्न सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना चार मुले आहेत.
पती कुटुंबासह आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. त्यानंतर देवरानी आणि जेठाणी यांच्यात लाथाबुक्क्यांनी जोरदार हाणामारीही झाल्याचे व्हिडिओत दिसते. प्रियकर एका ब्लॅकेट कंपनीत काम करत असल्याचे सांगितले जाते.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रियकर त्या महिलेच्या घरी ये-जा करत होता. म्हणजे हे प्रकरण फक्त एका दिवसाचे नव्हते, असे तिथले लोक सांगतात.
या सगळ्या गोंधळानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. त्यानंतर पुढील तपासासाठी पती आणि पत्नी या दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. या घटनेची माहिती सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्ट आणि व्हिडिओंमधून समोर आली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.