मॅकडोनाल्ड्समध्ये बर्गरची किंमत आता ठिकाणानुसार ठरणार? AI आणि डेटाचा वापर
मॅकडोनाल्ड्स AI आणि डेटाच्या मदतीने वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सनुसार बर्गरच्या किमती ठरवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे, मात्र भारतात ही प्रणाली अजून लागू झालेली नाही.
मॅकडोनाल्ड्स आता बर्गरच्या किमती सगळीकडे सारख्या न ठेवता वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सनुसार ठरवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. यासाठी कंपनी AI आणि डेटाचा वापर करत आहे. म्हणजेच बर्गरची किंमत सर्वत्र एकच असली पाहिजे असे राहणार नाही. या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
आता किमती ठिकाणानुसार आणि ग्राहकाला परवडणाऱ्या रकमेनुसार ठरवल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कंपनी सध्या प्रादेशिक पातळीवर बर्गरच्या किमती ठरवण्यावर काम करत आहे. म्हणजे एका भागात एक किंमत आणि दुसऱ्या भागात दुसरी किंमत, असे चित्र दिसू शकते.
याचे उदाहरण असे की, एखाद्या विशिष्ट भागातील लोक जास्त पैसे खर्च करायला तयार असतील, तर तिथे बर्गरची किंमत जास्त असू शकते. त्याच भागातले ग्राहक महागडा बर्गर घ्यायला तयार नसतील किंवा त्यांना तो परवडणारा नसेल, तर त्या भागातले दर त्यानुसार ठरवले जाऊ शकतात.
या सगळ्यात AI ची भूमिका महत्त्वाची असेल. वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधील विक्रीचा जुना डेटा काढून तो तपासला जाईल आणि कशाला जास्त मागणी आहे ते ठरवले जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांत बर्गरच्या किमतींमध्ये फरक दिसू शकतो.
मॅकडोनाल्ड्सची ही AI प्रणाली मोठ्या संख्येने रेस्टॉरंटमधील व्यवहारांच्या डेटावर लक्ष ठेवते आहे. कोणत्या भागात बर्गरला किती मागणी आहे आणि कोणत्या भागातील ग्राहक किती पैसे खर्च करू शकतात, हे शोधणे हा तिचा उद्देश आहे. त्यामुळे योग्य किंमत ठरवता येऊ शकते आणि त्याचा फायदा कंपनीला मिळू शकतो.
भारतात ही प्रणाली अजून लागू झालेली नाही. सध्या ती अमेरिकेतील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंट्समध्ये वापरली जात आहे. भारतात ती कधी लागू होणार, याबद्दल अजून कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
थोडक्यात, बर्गर खरेदी करताना ग्राहक कुठल्या भागात आहे आणि तिथे लोक किती खर्च करू शकतात, यावर किंमत ठरण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. मात्र भारतातील ग्राहकांसाठी यासंबंधी सध्या काहीही जाहीर झालेले नाही.