मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:31 IST

मासिक पाळीत रक्ताला उग्र वास कशामुळे येतो, इन्फेक्शन वाढल्यावर दिसणारी लक्षणे कोणती

मासिक पाळीदरम्यान रक्ताला वास येण्यामागची कारणे आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती.

मासिक पाळीत रक्ताला उग्र वास कशामुळे येतो, इन्फेक्शन वाढल्यावर दिसणारी लक्षणे कोणती
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुलींना वयाच्या साधारण १२ ते १३ वर्षानंतर मासिक पाळी सुरु होते आणि हे चक्र महिलांच्या शरीरात वर्षानुवर्षे चालू राहते. त्यामुळे दर महिन्याला महिलांना ४ ते ५ दिवस पाळी येते. पाळी सुरु झाल्यावर गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार होते, अंडाशयातून एक स्त्रीबीज बाहेर पडते आणि गर्भाशयाचा स्तर जाड होतो. हा जाड झालेला स्तर नंतर रक्त आणि ऊतींच्या स्वरूपात योनीमार्गातून बाहेर पडतो, यालाच मासिक पाळी म्हणतात. साधारणपणे हे चक्र २८ ते ३० दिवसांचे असते.

पाळी आल्यानंतर रक्ताला हलका किंवा किंचित धातूसारखा वास येणे ही सर्वसाधारण गोष्ट असते. पण अचानक जळजळ वाढली किंवा माशांसारखा उग्र वास येऊ लागला, तर ती साधी बाब नसून वाढत्या इन्फेक्शनचा इशारा असू शकतो. नाजूक अवयवांत जळजळ होणे, अचानक खाज सुटणे, वेदना होणे, पॅड वेळेवर न बदलणे, घाम, ओलावा आणि घट्ट कपडे यामुळेही वास येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पाळीदरम्यान दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. पाळी आल्यावर कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, ओटीपोटात दुखणे या तक्रारीही अनेकींना दर महिन्याला जाणवतात.

रक्ताला वास येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पाळीच्या काळात शरीरात होणारे हार्मोनल चढउतार, ज्याचा परिणाम काहीवेळा लगेच शरीरावर दिसून येतो. योनीमार्गात नैसर्गिकरीत्या निरोगी जिवाणू असतात, जे नाजूक अवयवांमधील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत करतात. मात्र पाळी आल्यावर योनीमार्गाचा pH बदलण्याची शक्यता वाढते. पॅडवर किंवा मेंस्ट्रुअल अंडरवेअरमध्ये साचलेले रक्त हवेच्या संपर्कात आल्यावर वास तयार होतो. पॅड खूप उशिरापर्यंत न बदलणे, जास्त रक्तस्त्राव, घामामुळे येणारी आर्द्रता, घट्ट आणि हवा न खेळणारे कपडे वापरणे किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनायसिससारखे इन्फेक्शन वाढणे, या सगळ्या कारणांमुळे रक्ताला घाण वास येण्याची शक्यता वाढते.

पाळीच्या दिवसांत नाजूक अवयवांची काळजी घेणे आवश्यक असते. सॅनिटरी पॅड दर ४ ते ६ तासांनी बदलावा किंवा रक्तस्त्राव जास्त होत असल्यास लगेच बदलावा. टॅम्पोनही ४ ते ६ तासांनी बदलणे गरजेचे आहे. मेंस्ट्रुअल कप, पॅड, टॅम्पोन बदलल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे, अन्यथा इन्फेक्शन वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

परफ्यूमयुक्त इंटिमेट वॉश, डिओड्रंट स्प्रे, सुवासिक पॅड आणि व्हॅजिनाल डच वापरणे टाळावे, कारण अशा उत्पादनांमुळे संवेदनशील त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा योनीमार्गातील नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. अनेक महिला नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशनचा वापर करतात, पण अशा उत्पादनांमुळे योनीमार्गात जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ