मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:40 IST

अनंत चतुर्दशीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज; राज्यातील 21 जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाने निम्म्या महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

अनंत चतुर्दशीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज; राज्यातील 21 जिल्ह्यांना अलर्ट
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून विविध भागांत सध्या पाऊस बरसत आहे. यातच आता जवळपास निम्म्या महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी, म्हणजे 25 सप्टेंबरला, अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान विभागाने या 21 जिल्ह्यांना दोन वेगवेगळ्या पातळीचे अलर्ट दिले असून, त्यानुसार पावसाची तीव्रता कुठे किती असू शकते, हे स्पष्ट केलं आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तितक्याच वेगाने म्हणजे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने राज्यातील तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर उरलेल्या 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यलो अलर्ट जाहीर झालेल्या 18 जिल्ह्यांमध्ये जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांची नावं आहेत. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे या यादीत आहेत.

25 सप्टेंबरसाठीचा विभागवार अंदाज पाहता, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, वीजा आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी अशाच स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत जोरदार ते खूप जोरदार पाऊस, तसंच मेघगर्जना व सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

26 सप्टेंबरसाठीही साधारण असाच अंदाज कायम राहणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ