लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीसाठी एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म सुरू
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह जोडलेले नेक्स्ट-जनरेशन रोबोटिक ओ-आर्म(R) सुरू केले आहे.
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने स्पाईन सर्जरीसाठी नवे तंत्रज्ञान आणले आहे. मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह जोडलेले नेक्स्ट-जनरेशन, एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म(R) हॉस्पिटलने सुरू केले आहे. जागतिक दर्जाच्या क्लिनिकल सुविधांमधून नवनव्या पद्धतींनी, रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्यसेवा देण्याच्या हॉस्पिटलच्या बांधिलकीतले हे आणखी एक मोठे पाऊल आहे, असे सांगण्यात आले.
हा प्लॅटफॉर्म गुंतागुंतीच्या स्पाईन शस्त्रक्रियांमध्ये सर्जनना मदत करण्यासाठी आहे. त्यात रीअल-टाइम २डी आणि ३डी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग, एआयच्या मदतीने सर्जिकल नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि प्रगत नेव्हिगेशन हे सगळे एकत्र येते. मणक्याची अंतर्गत रचना आपोआप ओळखणे, रचनांचे मोजमाप करणे आणि योग्य स्क्रू आकार, अचूक दिशा तसेच प्रत्यारोपणाची योग्य जागा सुचवणे, यातून ही यंत्रणा नियोजन अधिक सक्षम करते. शस्त्रक्रियेदरम्यान प्रत्येक क्लिनिकल निर्णयावर सर्जनचे पूर्ण नियंत्रण राहते, याचीही ती खात्री देते.
या सॉफ्टवेअरमध्ये प्रगत अल्गोरिदम वापरले आहेत. त्यांच्या मदतीने व्हर्टिब्रा, पेडिकल्स, एंडप्लेट्स आणि मुख्य शारीरिक खुणा काही सेकंदांत अचूक ओळखल्या जातात. हजारो प्रमाणित सर्जिकल प्लॅनिंग पॅरामीटर्सचा संदर्भ घेऊन ते सर्जनना इम्प्लांटचा आकार आणि अचूक दिशा सुचवते. क्लिनिकल अभ्यासाच्या आधारे सर्जन ही सूचना स्वीकारू शकतात, बदलू शकतात किंवा नाकारू शकतात. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत उपकरणांचे सातत्याने ट्रॅकिंग करून रोबोटिक यंत्रणा ठरवलेली दिशा राखण्यास मदत करते, तर ओ-आर्म(R) रीअल-टाइम पडताळणीसाठी उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग देते.
मणक्याशी संबंधित विकारांवरील उपचारांत हा प्लॅटफॉर्म मदत करतो. डीजनरेटिव्ह स्पाईन डिसऑर्डर, स्कोलियोसिस, कायफोसिस, स्पाईन ट्रॉमा, ट्यूमर, इन्फेक्शन्स आणि रिव्हिजन स्पाईन सर्जरी यांचा त्यात समावेश आहे. जास्त अचूकता लागणाऱ्या मिनिमली इन्वेसिव्ह आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी तो विशेष उपयोगी ठरतो, असे सांगण्यात आले. नेव्हिगेशनच्या मदतीने चालणाऱ्या रोबोटिक तंत्रज्ञानाने क्लिनिकल लक्षणे आणि शस्त्रक्रियेचे स्वरूप यानुसार स्पायनल इम्प्लांट आणि पेडिकल स्क्रू बसवण्यात ९५ ते ९९ टक्के अचूकता सिद्ध केली आहे.
हॉस्पिटलचे पर्मनंट ट्रस्टी श्री. राजीव मेहता म्हणाले, "लीलावती हॉस्पिटलमध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो, तसेच क्लिनिकल उत्कृष्टता देणाऱ्या जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करतो. मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म(R)चा समावेश आमच्या सर्जनना उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक टूल्सचा पुरवठा करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणतो, ज्यामुळे अधिक अचूकता, सुव्यवस्थित सर्जिकल कार्यपद्धती आणि रुग्णांसाठी अधिक चांगले वैद्यकीय परिणाम साध्य करता येतील. ही गुंतवणूक भारतातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते."
हॉस्पिटलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. रवींद्र करंजेकर म्हणाले, "रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान स्पाईन सर्जरीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगती आहे. एआय-सहाय्यित नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि रीअल-टाइम इमेजिंगमुळे सर्जनना विशेषतः गुंतागुंतीच्या आणि मिनिमली इन्वेसिव्ह केसेसमध्ये अधिक आत्मविश्वासाने अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करता येतात. इम्प्लांट अधिक अचूक बसवल्याने उतींना होणारा त्रास कमी होऊ शकतो, पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची शक्यता कमी होते, हॉस्पिटलमधील मुक्काम कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान उत्कृष्ट मार्गदर्शन पुरवत असले, तरी शस्त्रक्रियेसंबंधी प्रत्येक निर्णय पूर्णपणे संबंधित सर्जनला घ्यावा लागतो, ज्यामुळे रुग्णाच्या उपचारांमध्ये क्लिनिकल तज्ज्ञतेला प्राधान्य दिले जाईल याची खात्री मिळते."
एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म(R) आणि मॅझोर एक्स स्टील्थ एडिशन यांच्या समावेशामुळे लीलावती हॉस्पिटलने अचूक वैद्यकीय उपचार पद्धतींना पुढे नेणाऱ्या, रुग्णांचे आरोग्य परिणाम सुधारणाऱ्या आणि भारतातील स्पाईन व न्यूरोसर्जिकल केअरमध्ये नवा मापदंड ठरवणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आपले अग्रगण्य स्थान अधिक पक्के केले आहे, असे हॉस्पिटलने म्हटले आहे.