मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:26 IST

खंडाळा कारखाना सर्वांचा स्वाभिमान, तो जपूया: खासदार नितीन पाटील यांचे सभासदांना आवाहन

खंडाळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार नितीन पाटील यांनी सर्वांनी ऊस कारखान्यास घालण्याचे आवाहन केले.

खंडाळा कारखाना सर्वांचा स्वाभिमान, तो जपूया: खासदार नितीन पाटील यांचे सभासदांना आवाहन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. सर्व गटांचे सभासद सभेला उपस्थित होते. सभा अत्यंत खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात पार पडत असल्याचा आनंद वाटतो, असे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.

खंडाळा कारखाना अडचणीत आहे आणि तो बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले. खंडाळा तालुक्यातील हा सहकारी साखर कारखाना आपल्या सर्वांचा स्वाभिमान आहे, तो सर्वांनी मिळून जपला पाहिजे आणि आपण तो जपू या, अशी भावनिक साद त्यांनी घातली. कारखान्यासाठी उपस्थित ज्येष्ठ मंडळींनी योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

सभेला ज्येष्ठ नेते व कारखान्याचे माजी चेअरमन शंकरराव गाढवे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे आणि दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार पाटील पुढे म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थितीत किसन वीर आणि खंडाळा हे दोन्ही कारखाने ताब्यात घेतले. मागील चार वर्षांत विविध अडचणींना तोंड देत गळित हंगाम पार पाडले आणि इतर कारखान्यांबरोबर दर देण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे. मागील सिझनमध्ये ८८ दिवसांत सरासरी २९०० मेट्रिक टनाने गाळप करून आतापर्यंतचे सर्वाधिक गाळप करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. गळित हंगाम सन २०२६-२७ मध्येही असेच गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, आणि ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या ३० किमीच्या अंतरावर ४ लाख टन ऊसाचे क्षेत्र आहे. नेतेमंडळींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपली सहकारी संस्था वाचवण्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले. त्यासाठी सर्वांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास घालावा आणि हा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. ज्यादिवशी किसन वीर कारखान्याची सर्व देणी दिली जातील, त्यादिवशी हा कारखाना या संचालक मंडळाच्या स्वाधीन केला जाईल, अशी ग्वाहीही खासदार नितीन पाटील यांनी दिली.

आम्ही संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही आणि करणारही नाही, असे सांगून पाटील म्हणाले की, साखर धंद्यासाठी येणारा काळ अडचणीचा आहे आणि शेतकरी ऊस पिकापासून परावृत्त होत आहेत. कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने गाळप हंगाम कमी दिवसांचा झाला असून, ही बाब चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांनी आपला आणि परिसरातील ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे आणि उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे म्हणाले की, नुकताच कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या शुभहस्ते झाला. शासनाने १५ ऑक्टोंबरपासून कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कारखान्यातील सर्व कामे झाली असून कारखाना गाळपास सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. मागील हंगामात सर्वाधिक गाळप झाले, पण उद्दिष्ट गाठता आले नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असेही तांबे यांनी सांगितले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तम पाटील यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली. संचालक डी. एम. भोसले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, धनाजी अहिरेकर, किसन ननावरे, शिवाजी शेळके-पाटील, रत्नकांत भोसले, सुरेश रासकर, शालिनी पवार, किसन वीर कारखान्याचे संचालक रामदास गाढवे, संदिप चव्हाण, किरण काळोखे, प्रकाश धुरगूडे, सचिव सागर गाढवे यांच्यासह शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ