मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:25 IST

कास पठारावर सलग सुट्ट्यांमध्ये वीस हजार पर्यटक, नियोजनाअभावी वाहतूक कोंडी

अनंत चतुर्दशीला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे कास पठारावर गर्दीचा उच्चांक, पण वनविभाग आणि कास वनसमितीच्या अपुऱ्या नियोजनामुळे पर्यटकांचे हाल.

कास पठारावर सलग सुट्ट्यांमध्ये वीस हजार पर्यटक, नियोजनाअभावी वाहतूक कोंडी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अनंत चतुर्दशीला शनिवार-रविवार जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत हजारो पर्यटकांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराला भेट दिली आणि तिथल्या फुलांचा आनंद लुटला. पण या गर्दीचे नियोजन करण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरल्याचे या तीन दिवसांत दिसून आले. पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने आणि एकंदरीत नियोजनाचा अभाव असल्याने हजारो पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

तिन्ही दिवसांसाठी आरक्षित असलेले तीन हजार पर्यटकांचे ऑनलाईन बुकिंग आधीच फुल्ल झाले होते. मात्र त्यानंतरही एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक थेट पठारावर पोहोचले आणि त्यांनी ऑफलाईन तिकीट काढून प्रवेश मिळवला. या तीन दिवसांत वीस हजारांहून अधिक पर्यटकांनी कास पठाराला भेट दिल्याने तिथे जत्रेसारखे वातावरण तयार झाले होते.

इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी वनविभाग आणि कास वनसमितीने कोणतीही ठोस तयारी केली नव्हती, त्यामुळे पठारावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहने लावण्यासाठी जागाच अपुरी पडली, तर फुलांच्या ठिकाणी आत सोडण्यासाठी पर्यटकांची लांबलचक रांग लागलेली दिसली.

सध्या कास पठारावर लाल-गुलाबी तेरडा चांगलाच बहरला असून संपूर्ण पठार लाल, गुलाबी, निळ्या आणि जांभळ्या रंगांनी नटलेले दिसत आहे. यासोबतच मिकी माऊस, कंदील पुष्प, सोनकी, चवर, गेंद, निळी-जांभळी मंजिरी, पाचगणी आमरी यांसारख्या फुलांच्या तसेच काही किटकभक्षी फुलांच्या दुर्मिळ प्रजातीही पठारावर पाहायला मिळत आहेत.

पठारावरील प्रसिद्ध कुमुदिनी तलावातील पांढरी कमळेही आता उमलू लागली असून पर्यटकांचे लोंढे याकडे आकर्षित होत आहेत. राजमार्गावर असणारा हा तलाव थोडा लांब असल्याने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची सोय करण्यात आली आहे. प्रति व्यक्ती शंभर रुपये तिकीट आकारून पर्यटकांना इलेक्ट्रिक वाहनातून ही सफर घडवली जात आहे. यंदा विकसित करण्यात आलेल्या नव्या पॉईंटवरही मोठी गर्दी दिसत असून त्यातही मंडपघळ या नव्या पर्यटन पॉईंटवर विशेष गर्दी होत आहे.

दुसरीकडे, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांच्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कास पठार हे कातळ खडकाचे असून तिथे मातीचे प्रमाण अत्यल्प असल्याने ओलावा धरून ठेवण्याची क्षमताही कमी आहे. त्यात पावसाने घेतलेली विश्रांती आणि कडक ऊन यामुळे पठारावरील जैवविविधता लवकर वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नेहमीपेक्षा यंदा पठारावरील फुले लवकर निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ