शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
10:29 IST

माओवाद्यांच्या पत्रात जेन झी आंदोलनाचा वापर करण्याचा उल्लेख; सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू

सुरक्षा यंत्रणांनी हस्तगत केलेल्या गोपनीय पत्रात जेन झीच्या आंदोलनाचा वापर करण्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे.

माओवाद्यांच्या पत्रात जेन झी आंदोलनाचा वापर करण्याचा उल्लेख; सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सुरक्षा यंत्रणांनी माओवाद्यांमधील दोन वरिष्ठ कॉम्रेडमधील एक अत्यंत गोपनीय पत्र हस्तगत केले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या विविध आक्रमक आंदोलनांचा, विशेषतः जेन झीच्या आंदोलनाचा फायदा घेऊन माओवादी आपला विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न या पत्रामुळे उभा राहिला आहे.

हे पत्र माओवाद्यांच्या इंटरनॅशनल सेलमधील "कॉम्रेड धीरज" याने अत्यंत वरिष्ठ माओवादी "कॉम्रेड अजिथ उर्फ के मुरलीधरन" याला लिहिले आहे. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या जेन झी आणि तरुणांच्या मनातील रोष अधिक धारदार करण्याचा उल्लेख त्यात आहे. पत्रातील मजकुराचे गांभीर्य ओळखून सुरक्षा एजन्सीने सखोल चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

पत्रात कॉम्रेड धीरज म्हणतो की "YY" (टोपणनाव किंवा कोड नेम) याने सरकारविरोधी आंदोलनाची विशेष रणनीती तयार केली आहे. त्यानुसार येणारी जन आंदोलने आणि राजकीय संघर्षासाठी जेन झीच्या नेटवर्कचा सक्रियपणे वापर करायचे ठरले आहे. सरकारविरोधातील सध्याचे संघर्षाचे वातावरण जेन झी आणि तरुणाईला पुढे करून अधिक तीव्र करावे, असेही त्यात म्हटले आहे.

माओवाद्यांनी ठरवलेल्या कृती आराखड्यानुसार तरुणांच्या शक्तीचा उपयोग करून तळागाळातून सरकारविरोधात अनेक मोहिमा राबवाव्यात. त्यातून सरकारला थेट आव्हान द्यावे आणि आंदोलनात हिंसाचार झाला, तर त्या परिणामांसाठी सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करावा, असा पत्रात उल्लेख आहे.

या नियोजित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या सात राज्यांतील अनेक अंडरग्राऊंड शहरी माओवादी सहकारी पुन्हा एकत्र येऊन, ठरलेल्या वेळापत्रकानुसार आक्रमक जन आंदोलन सुरू करण्यास तयार आहेत, असे पत्रात नमूद आहे.

"YY" याने तयार केलेल्या रणनीतीनुसार ही सर्व जन आंदोलने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राबवलेल्या "भारत जोडो अभियाना"च्या प्रयोगाशी जोडण्याची तयारी आहे. भारत जोडो अभियानासोबत जेन झी आणि सरकारवर नाराज असलेल्या तरुणांची आक्रमक आंदोलने जोडली गेली, तर सध्याचे सरकार उखडून फेकणे शक्य होईल, असे त्यात म्हटले आहे. अनेक राजकीय पक्षही "भारत जोडो अभियान" आणि "जेन झी" यांच्या संयुक्त प्रयोगासोबत येऊन सरकारविरोधात एकत्रित शक्ती उभी करण्यास तयार असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

वेगवेगळ्या मुद्द्यांवर जेन झीच्या आंदोलनाचा फायदा घेऊन शहरी माओवादी आपले हेतू साध्य करण्यासाठी जेन झीचा गैरवापर करण्याच्या तयारीत असल्याचे या पत्रातून दिसून येत आहे, अशी माहिती आहे. या पत्रातील मजकुराची सुरक्षा एजन्सीकडून सखोल चौकशी सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ