मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:22 IST

इराणचा इशारा: हल्ला झाल्यास तिप्पट प्रत्युत्तर देणार

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला २०३ दिवस पूर्ण झाले असून आता येमेनचे हुती, ओमान, जॉर्डन, यूएई, कुवैतसह अनेक देश यात ओढले गेले आहेत. इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की हल्ला झाल्यास तिप्पट प्रत्युत्तर मिळेल.

इराणचा इशारा: हल्ला झाल्यास तिप्पट प्रत्युत्तर देणार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मध्य पूर्वेतील युद्धाचा आज २०३ वा दिवस सुरु आहे. हे युद्ध आता केवळ इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. येमेनचे हुती, येमेनचे सौदी समर्थक सरकार, ओमान, जॉर्डन, यूएई आणि कुवैतसारखे अनेक मध्य पूर्वेतील देश यात सहभागी झाले आहेत. इस्रायल सध्या इराणवर थेट हल्ले करत नसला तरी लेबनॉन आणि गाझामध्ये त्याची कारवाई सुरूच आहे.

एवढा काळ सुरु असलेल्या या युद्धात नेमके कोण जिंकले आणि कोण हरले, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. काही जाणकारांच्या मते इराण वरचढ ठरला आहे, तर काहींचे मत याच्या उलट आहे. पण कमजोर समजल्या जाणाऱ्या इराणला ट्रम्प आणि नेतन्याहू एकत्र येऊनही हरवू शकले नाहीत, हे मान्य करावे लागेल.

काही काळासाठी इराण आणि अमेरिका यांनी एकमेकांवरील हल्ले कमी केल्यानंतर युद्ध शांत झाल्यासारखे वाटत होते. पण ही शांतता एका मोठ्या वादळाची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळात या शांततेचा वापर अमेरिका इराणवरील मोठ्या हल्ल्याच्या तयारीसाठी करत असल्याची चर्चा आहे. अमेरिका आता थेट इराणशी जमिनीवरील युद्ध करू शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे इराणही याच शांततेच्या काळात आपल्या सैन्याची ताकद वाढवत आहे. इराणने आपली सैन्यसंख्या जवळपास ४ लाखांपर्यंत नेल्याचे इराणकडून सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत इराणने तेहरानमधील नागरिकांना युद्ध प्रशिक्षण आणि सराव मोहीम हाती घेऊन याची प्रचिती जगाला करून दिली. यात पुरुषांबरोबर महिलाही अग्रेसर असल्याचे दिसले आहे. जमिनीवर हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी इराण सज्ज होत आहे. आर्थिक नाकेबंदी आणि आकाशातील युद्ध करूनही इराणवर विजय मिळवता न आल्याने आता जमिनीवरचा घातक पर्याय अमेरिका आणि इस्रायल निवडणार का, यावर पुन्हा एकदा जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मध्य पूर्व पुन्हा पेटणार का, हे पाहावे लागेल.

इराणने एक स्पष्ट सूचना जाहीर केली आहे की जर अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ला केला, तर मध्य पूर्वेतील ज्या ज्या देशांनी अमेरिकेला आपली जमीन वापरण्यास दिली आहे आणि ज्या देशांच्या जमिनीवर अमेरिकेने आपले सैन्य तळ उभारून हल्ले केले आहेत, त्या देशांवर आणि अमेरिकेच्या सैन्य तळांवर जोरदार हल्ले केले जातील. म्हणजेच जिथून एक मिसाईल इराणवर येईल, तिथूनच इराणकडून तीन मिसाईल्स परत येतील, हे लक्षात ठेवावे असे इराणने बजावले आहे.

दरम्यान, काल रात्री युक्रेनने रशियाच्या तेल साठ्यावर हल्ला केला असून तब्बल १६०० ड्रोन्स मॉस्कोवर सोडण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेही युक्रेनवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. हे सुरु असतानाच हुतींनी सौदीच्या तेल पाइपलाईनवर हल्ला करून ती उध्वस्त केली आहे, त्यामुळे युरोपला होणारा तेलपुरवठा एका आठवड्यासाठी बंद करण्यात आला आहे.

याशिवाय हुतींनी बाब अल मंदेब सामुद्रधुनीत (लाल समुद्रात) सौदीला पूर्णपणे बंदी घातल्याने तो मार्गही बंद झाला आहे, तर होर्मूझ सामुद्रधुनी आधीपासूनच बंद आहे. या सगळ्या परिस्थितीवर अमेरिकेतील जेपी मॉर्गन बँकेने जाहीर केले आहे की हे युद्ध कधी थांबेल आणि जागतिक तेल व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरळीत कधी होईल, हे आम्हालाही माहीत नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या बेभरवशी वागण्याला कधी आळा बसेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ