मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शेकडो ईमेलच्या गर्दीत महत्त्वाचा मेल सुटतोय? जिमेलची ही ट्रिक वापरा, मेल येताच वाजेल रिंगटोन

शेकडो ईमेलच्या गर्दीत महत्त्वाचा मेल सुटतोय? जिमेलची ही ट्रिक वापरा, मेल येताच वाजेल रिंगटोन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

ठराविक ईमेल एड्रेससाठी लेबल, फिल्टर आणि नोटिफिकेशन साऊंडची सेटिंग केली, की त्या एड्रेसवरून मेल येताच तुमच्या जिमेलवर रिंगटोन वाजेल.

जिमेलवर आपल्याला रोज शेकडो ईमेल येतात. त्यातले बहुतेक ईमेल जाहिरातींचे असतात आणि कामाचे मेल त्या मानाने थोडेच असतात. अशा शेकडो ईमेलच्या गर्दीत एखाद्या महत्त्वाच्या ईमेलकडे आपले दुर्लक्ष होते, हे अनेकदा घडते.

कुठल्याही ईमेलकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण सारखे इनबॉक्सवर नजर ठेवू शकत नाही. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरता येते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या ईमेलची वाट पाहत असाल आणि गर्दीत तो मेल सुटू नये असे वाटत असेल, तर त्या ठराविक मेलसाठी अलर्ट सेट करता येतो. असा महत्त्वाचा मेल आला की लगेच रिंगटोन वाजते आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळते.

ही सेटिंग दोन टप्प्यांत करायची आहे. आधी लेबल आणि फिल्टर बनवायचे, मग अलर्टची सेटिंग करायची. सुरुवातीला जीमेलवर एक लेबल तयार करावे लागते. लेबल या पर्यायासमोर प्लस (+) साइन दिसतो, त्यावर क्लिक करा आणि लेबलला नाव देऊन ते क्रिएट करा. त्यानंतर कंप्यूटरवर जिमेल उघडा.

पुढची पायरी म्हणजे सर्च बारच्या उजव्या बाजूला असलेल्या फिल्टर पर्यायावर क्लिक करणे. स्क्रीनवर From नावाचा बॉक्स दिसेल. ज्या ईमेल एड्रेसवरून येणारे मेल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तो एड्रेस या बॉक्समध्ये लिहा. मग क्रिएट फिल्टर पर्यायावर क्लिक करा.

इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, अप्लाय द लेबल आणि अलवेज मार्क इट ॲज इंपॉर्टंट. अप्लाय द लेबलमध्ये तुम्ही आधी बनवलेल्या लेबलचे नाव दिसेल, ते निवडा. त्यानंतर अलवेज मार्क इट ॲज इंपॉर्टंट हा पर्यायही निवडा आणि पुन्हा क्रिएट फिल्टरवर टॅप करा. एवढे केल्यावर तुम्ही दिलेल्या ईमेल एड्रेसवरून कोणताही मेल आला, तर तो इनबॉक्समध्ये तर दिसेलच, पण तुम्ही बनवलेल्या लेबलमध्येही दिसेल.

आता अलर्टची सेटिंग करायची. कंप्यूटरवर सर्च बारच्या बाजूला सेटिंग पर्याय दिसतो, त्यावर क्लिक करून सी ऑल सेटिंग पर्याय निवडा. मग जनरल पर्यायावर टॅप करा आणि खाली स्क्रोल करा. तिथे डेस्कटॉप नोटिफीकेशन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि इम्पॉर्टंट मेल नोटिफिकेशन्स ऑन हा पर्याय निवडा.

याच ठिकाणी मेल नोटिफिकेशन साऊंड हा पर्यायही दिसेल. त्यातल्या यादीतून तुम्हाला आवडणारी रिंगटोन निवडा. यानंतर तुम्ही ठरवलेल्या विशिष्ट ईमेल आयडीवरून मेल येताच ही रिंगटोन वाजेल. त्यामुळे तुम्ही ज्या ईमेलची वाट पाहत होतात, तो कदाचित आला असावा, हे तुम्हाला लगेच समजेल.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ