एकदा रिचार्ज करा, वर्षभर निश्चिंत रहा: बीएसएनएलचा 2,799 रुपयांचा प्लॅन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी 365 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा नवा वार्षिक रिचार्ज प्लॅन आणला आहे. किंमत 2,799 रुपये आहे.
दर महिन्याला रिचार्ज करायचा कंटाळा येतो का? अनेकांना वारंवार रिचार्ज करणे नकोसे वाटते. अशा लोकांसाठी बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी एक नवा वार्षिक रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. त्यामुळे यूजर्सना दर महिन्याला रिचार्जची तारीख लक्षात ठेवण्याची गरज राहत नाही.
कंपनीने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करून या नव्या प्लॅनबद्दल माहिती दिली आहे. वर्षभराची व्हॅलिडिटी देणाऱ्या या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपये आहे. एवढ्या रकमेत ग्राहकांना संपूर्ण वर्षभर व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्याबरोबरच इतर फायदेही दिले जाणार आहेत.
बीएसएनएलच्या या ॲन्युअल रिचार्ज प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 365 दिवसांची व्हॅलिडिटी. अनेक यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. अशा यूजर्ससाठी दीर्घ काळ व्हॅलिडिटी देणारे रिचार्ज प्लॅन फायद्याचे ठरतात.
डेटाचा विचार केला तर या प्लॅनमध्ये रोज 3GB हाय-स्पीड डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे यूजर्सना व्हिडीओ बघण्यासाठी किंवा इंस्टाग्राम रिल्स स्क्रोल करण्यासाठी भरपूर डेटा मिळणार आहे.
कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. म्हणजेच यूजर्स संपूर्ण देशभरात लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळणार आहे. ज्यांना इंटरनेटबरोबरच कॉलिंग आणि एसएमएसचे फायदेही हवे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे.
खर्चाचा विचार केला तर, 365 दिवसांच्या कालावधीनुसार सरासरी खर्च दररोज सुमारे ७.६७ रुपये इतका येतो. दीर्घ व्हॅलिडिटीमुळे ग्राहकांना दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही सुटका मिळेल. म्हणजेच एकदा 2,799 रुपयांचा रिचार्ज केला की वर्षभर निश्चिंत राहता येईल.
थोडक्यात सांगायचे तर, 2,799 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 3GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस असे फायदे मिळणार आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.