९,०००mAh बॅटरीसह वनप्लस टर्बो 6Vs चीनमध्ये लाँच, किंमत 3,699 युआन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वनप्लसने चीनमध्ये 'टर्बो' मालिकेतील नवा मिड-रेंज 5G स्मार्टफोन OnePlus Turbo 6Vs सादर केला आहे. यात 9,000mAh बॅटरी, 80W वायर्ड चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर आहे.
स्मार्टफोन कंपनी वनप्लसने चीनमध्ये आणखी एक नवीन 'टर्बो' मालिकेतील मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन फोन OnePlus Turbo 6Vs या नावाने सादर करण्यात आला असून, तो चीनच्या ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने मोठी बॅटरी दिली आहे. त्याचे स्पेसिफिकेशन्स बऱ्याच प्रमाणात वनप्लस टर्बो 6V सारखेच वाटत आहेत.
आधी किंमत आणि उपलब्धता पाहू. चीनमध्ये हा फोन 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये आणला गेला आहे. या डिव्हाईसची किंमत 3,699 युआन आहे, म्हणजेच सुमारे 53 हजार रुपये. ग्राहकांना तो ऑरेंज आणि नोवा व्हाइट या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळतो. मात्र, चिनी ऑनलाईन स्टोअरच्या पेजवर हा फोन आताच 'सोल्ड आऊट' म्हणजेच विक्रीसाठी उपलब्ध नाही, असे दाखवत आहे. तो पुन्हा केव्हा उपलब्ध होईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आता फोनच्या डिस्प्लेकडे येऊ. यात 6.78-इंच फ्लॅट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यावर 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. स्क्रीनची ब्राइटनेस जास्तीत जास्त 1,800 निट्सपर्यंत जाऊ शकते. याशिवाय हाय-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम आणि डिसी-सारखी डिमिंग टेक्नोलॉजी देखील फोनमध्ये मिळणार आहे. डिव्हाईसची जाडी 8.5mm आहे.
फोनला ताकद देण्यासाठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सध्या हा स्मार्टफोन फक्त 12GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेजच्या पर्यायात मिळतो. म्हणजे इतर कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही.
पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या डिव्हाईसला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग देण्यात आले आहे. त्याशिवाय स्टीरियो स्पीकर, X-एक्सिस मोटर, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, आयआर ब्लास्टर आणि एनएफसी अशी फीचर्स देखील यात मिळणार आहेत.
कॅमेऱ्याचा विचार केला तर नव्या वनप्लस टर्बो 6Vs मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनो सेंसर मिळणार आहे. सेल्फी काढण्यासाठी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या फोनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यातील 9,000mAh बॅटरी. ती चार्ज करण्यासाठी 80W वायर्ड चार्जिंग मिळते. याशिवाय 27W पर्यंत रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि 'बायपास चार्जिंग' सारखी फीचर्स देखील फोनमध्ये मिळणार आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.