शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
12:31 IST

घुग्घुसमध्ये कोळशाचा ट्रक पेटवला; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

घुग्घुस ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतुकीचा ट्रक पेटवल्याच्या प्रकरणात चार जणांची नावे निष्पन्न झाली असून दोघांना अटक झाली आहे.

घुग्घुसमध्ये कोळशाचा ट्रक पेटवला; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर : घुग्घुस येथे कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटवण्यात आल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. उरलेल्या दोघांचा सहभाग सखोल चौकशीत समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता घुग्घुस ओपनकास्ट खदानाजवळ घडली. कोळसा वाहतूक करणारा महिंद्रा ट्रक, क्रमांक एमएच ३४ सीक्यू ३३८५, अज्ञात व्यक्तींनी अडवला. त्यानंतर पेट्रोल टाकून ट्रकला आग लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली.

ट्रकचालक रमाकांत बाबूलाल सिंह (वय ३५, रा. नकुनी, ता. बेहारी, जि. सहडोल, मध्य प्रदेश) यांनी तक्रार दिली. त्यावरून घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२६ (फ), १२६ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास केला. या तपासात पोलिसांनी खुर्शीद उर्फ फरदीन इक्रम शेख (वय २६, रा. शास्त्रीनगर वॉर्ड क्र. १, घुग्घुस) आणि समशेर महेबूब शेख (वय २९, रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) या दोघांना अटक केली.

सखोल चौकशीत इरफान शेख (रा. श्रीराम वॉर्ड, घुग्घुस) आणि अफताब नफीस शेख (रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) यांचाही या कृत्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी संगनमत करून ट्रकला आग लावल्याची कबुली दिली असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

काम आणि रोजगारासंबंधीच्या नाराजीतून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी पथकाचे नेतृत्व केले. पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर, पोलीस हवालदार सतीश अवधरे, इम्रान खान, लालू यादव, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, पोलीस अंमलदार किशोर वाकडे आणि शशांक बदाम यांचा समावेश होता. सायबर पोलीस स्टेशनचे कार्तिक खनके, अनिमेश आणि गुणवंत यांनीही कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ