दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार, पंढरपुरातून आंदोलनाची सुरुवात

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार, पंढरपुरातून आंदोलनाची सुरुवात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

कोल्हापूरनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला असून रविवारी पंढरपुरात पत्रकार परिषद घेणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांत ऊसदरासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देत नाहीत, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. या आरोपानंतर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी शेट्टी रविवारी, ८ तारखेला पंढरपूर येथून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. त्या दिवशी सकाळी १० वाजता ते पंढरपुरात पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत ते पुढच्या आंदोलनाची दिशा आणि रणनीती जाहीर करणार आहेत.

कोल्हापुरात ज्या पद्धतीने संघर्ष करून शेतकऱ्यांना जास्त दर मिळवून दिला, त्याच पद्धतीने सोलापुरातही कारखानदारांच्या विरोधात लढा उभारणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

किणी टोलनाक्यावरचा रास्ता रोको शेट्टी यांनी मागे घेतला. त्यामुळे त्या महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. चार हजार रुपये एकरकमी मिळावेत, या मागणीवर आपण शेवटपर्यंत ठाम होतो, असे शेट्टी यांनी सांगितले. इतर संघटनांनी मात्र ३९०० रुपयांचा प्रस्ताव मान्य केला. वाहतूकदार आणि पोलीस यांची परिस्थिती लक्षात घेऊन आपण नाराजीनेच आंदोलन मागे घेतले, असेही शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, कोल्हापुरातील ऊसदर आंदोलनावर तोडगा निघाला आहे. कारखानदारांनी कोणतीही कपात न करता प्रतिटन ३९०० रुपये पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय गाळप हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये अतिरिक्त देण्याचे, तसेच साखरेचा दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये झाल्यास आणखी २०० रुपये देण्याचेही त्यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. म्हणजे कारखानदारांनी ही रक्कम तीन टप्प्यांत देण्याचे मांडले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ