दुष्काळी तालुक्यांतील 2 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी शुल्काविना भरले परीक्षा अर्ज
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असून, 'झिरो चलन' सुविधेद्वारे 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांवर पैशांचा बोजा पडू नये, म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता जोरात सुरू आहे. आतापर्यंत 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता 'झिरो चलन' सुविधेतून परीक्षा अर्ज भरले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या हेतूने शासनाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घ्यायचे नाही असे ठरवले आहे. हा निर्णय नीट राबवला जावा आणि पात्र विद्यार्थ्यांना सवलत मिळावी, यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभाग या पातळीवर आवश्यक यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. विभागाकडून त्याचा सतत आढावा घेतला जात आहे.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागू नयेत, म्हणून अर्जाच्या प्रक्रियेत 'झिरो चलन' हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थी कोणतेही शुल्क न भरता अर्ज दाखल करू शकत आहेत. शुल्कमाफीच्या अंमलबजावणीबाबत सर्व विद्यापीठांनी परिपत्रकेही काढली आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी याआधीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते परत देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील कोणताही पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नये आणि लाभ घेताना त्याला अडचण येऊ नये, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
शुल्कमाफीबाबत शैक्षणिक अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाशी किंवा जनसंपर्क अधिकारी आणि विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
विद्यापीठनिहाय संपर्क असा: मुंबई विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९) आणि जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७). सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४) आणि अजय ठुबे (७५८८१६९१३४).
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९) आणि विद्यार्थी विकास संचालक अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०). पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. अंधारे (९९७५०५५१५५) आणि डॉ. काळवणे (७०२०६३४५०२). स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१) आणि डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२) आणि डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१). कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३) आणि महाले (९८२३१९२८३१). संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७) आणि डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०) आणि डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५). गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५) आणि डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९). एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथे संजय नेरकर (९९२२४४४४६७) आणि डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९). यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५) आणि महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.