मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:27 IST

रघुवंशी कॉम्प्लेक्स आग: २२ आस्थापनांना मनपाने बजावली नोटीस

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी ३० तासांहून अधिक प्रयत्नांनंतर रघुवंशी कॉम्प्लेक्समधील आग नियंत्रणात आणली.

रघुवंशी कॉम्प्लेक्स आग: २२ आस्थापनांना मनपाने बजावली नोटीस
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्सला रात्रीच्या सुमारास आग लागली होती. या कॉम्प्लेक्समध्ये सुमारे पन्नास दुकाने आहेत आणि आग लागल्यानंतर हा संपूर्ण कॉम्प्लेक्स धोक्यात आला होता. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी तीस तासांहून अधिक काळ अथक प्रयत्न केले, आणि अखेर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. एवढा मोठा कॉम्प्लेक्स धोक्यात असतानाही मनपाच्या प्रयत्नांमुळे आग एकाच दुकानापुरती मर्यादित ठेवण्यात यश आले, त्यामुळे इतर दुकानांचे मोठे नुकसान टळले. या बचावकार्यात अग्निशमन विभागाचे सुमारे तीस अधिकारी आणि कर्मचारी रात्रभर सहभागी होते.

आग विझल्यानंतर मनपाने रघुवंशी कॉम्प्लेक्समधील बावीस आस्थापनाधारकांना नोटिसा बजावल्या असून नियमानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तसेच मेसर्स इंडियन मेडिकल एजन्सी यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मनपाने सांगितले. नियमानुसार दंडात्मक कारवाईदेखील केली जात असून या प्रकरणात आवश्यक ती सर्व कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार सुरू आहे.

बचावकार्यात अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाडसाने आणि सातत्याने काम केले. राहुल पंचबुद्धे आणि चिवंडे यांनी जोखमीच्या परिस्थितीत प्रत्यक्ष घटनास्थळी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अतिक्रमण विभागाचे मनीष शुक्ला आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने काम केले. यांत्रिकी विभागाचे चेतन्य चौरे यांनी अग्निशमन वाहनांसाठी पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित केला, जेणेकरून आग विझवण्याचे काम अखंडपणे सुरू राहील. विद्युत विभागाच्या प्रगती भुरे यांनी रात्रीच्या बचावकार्यासाठी हॅलोजन लाईट्सची व्यवस्था केली, जेणेकरून अंधारातही बचावकार्य सुरळीत चालू शकेल.

आग आटोक्यात आल्यानंतर स्वच्छता विभागाचे गर्गेलवार आणि त्यांच्या पथकाने जळालेला कचरा व साहित्य तातडीने हटवले. भंडारपाल विभागाचे अहेमद सिद्दिकी यांनी बचावकार्यात सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जेवण, नाश्ता आणि इतर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली, जेणेकरून रात्रभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचण येऊ नये. तसेच DDMO सलीम शेख हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याला सक्रिय सहकार्य करत होते.

आयुक्त अकुनूरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने एकत्र काम करत मोठी दुर्घटना टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे मनपाने नमूद केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ