गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

चंद्रपुरात कारचे टायर चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात, दोन गुन्ह्यांची उकल

चंद्रपुरात कारचे टायर चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात, दोन गुन्ह्यांची उकल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

नागपूर रोड आणि कुंदन प्लाझा चौक परिसरात उभ्या कारचे अलॉय व्हीलसह टायर चोरीला गेले होते. रामनगर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून १ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रपूर : शहरात उभ्या असलेल्या दोन कारचे चारही टायर अलॉय व्हीलसह चोरीला गेल्याच्या दोन घटना रामनगर पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. नागपूर रोड आणि कुंदन प्लाझा चौक परिसरात या कार पार्क केलेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांची चाके काढून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

त्या बालकाकडून चोरीचे आठ टायर अलॉय व्हीलसह, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी आणि चारचाकी गाडीचा जॅक जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ७० हजार ५०० रुपये आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बालकाने दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले.

पहिली घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०० ते २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली. तक्रारदार भूषण नारायणराव गवांडे (रा. कुंदन प्लाझा चौक, चंद्रपूर) यांनी त्यांची मारुती सुझुकीची ब्रेझा कार नागपूर रोडवरील आपल्या गॅरेजसमोर पार्क केली होती. या वेळेत अज्ञात चोराने संधी साधून कारचे चारही टायर अलॉय व्हीलसह लंपास केले. गवांडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल झाला होता.

दुसरी घटना कुंदन प्लाझा चौकातील ए.वन कार वॉशिंग सेंटरसमोर घडली. लक्की मुबारक हुसेन अन्सारी यांच्या गॅरेजवर आलेली बलेनो कार तिथे लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी तिचेही चारही टायर अलॉय व्हीलसह काढून नेले. याबाबतही रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. १२३२/२०२६ नुसार, भासं कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना सूचना दिल्या.

पथक परिसरात चोरट्यांचा शोध घेत असताना हवेली गार्डन परिसरातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने ही चोरी केल्याचे समोर आले. कार घेण्यासाठी कमी पडलेले पैसे गोळा करायचे, या उद्देशाने त्याने चोरी केली होती. पोलिसांनी त्याला पालकांसमोर ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्यूटी साखरे यांनी पार पाडली.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ