मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:33 IST

चंद्रपुरातील स्थानिक तरुणांना Apprenticeshipच्या जास्त संधी द्या, शिवसेनेची मागणी

WCL आणि MIDCमधील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षणाच्या संधी द्याव्यात यासाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

चंद्रपुरातील स्थानिक तरुणांना Apprenticeshipच्या जास्त संधी द्या, शिवसेनेची मागणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्हा हा उद्योग आणि खाणींसाठी ओळखला जातो, पण याच जिल्ह्यात ITI, Diploma, Engineering आणि पदवी पूर्ण केलेले अनेक तरुण अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. WCL, MIDC आणि जिल्ह्यातील मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना हवी तशी संधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना भारतीय कामगार संघटनेने केला आहे.

भारत सरकारच्या NATS म्हणजे National Apprenticeship Training Scheme आणि NAPS म्हणजे National Apprenticeship Promotion Scheme या योजनांमधून तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्टायपेंड मिळण्याची सोय आहे. चंद्रपूर जिल्हा हा Board of Apprenticeship Training (Western Region), मुंबईच्या कार्यक्षेत्रात येतो.

सध्या WCLमध्ये 2026 साठी वेगवेगळ्या ट्रेडमध्ये Apprenticeship भरतीची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या संधींचा जास्तीत जास्त फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना मिळावा, या मागणीसाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात WCLच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी उत्तर आणि माजरी या क्षेत्रांमध्ये स्थानिक तरुणांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच MIDCमधील सगळ्या कंपन्यांची बैठक घेऊन NATS आणि NAPS अंतर्गत उपलब्ध असलेल्या जागांचा आढावा घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. ITI, Diploma आणि Engineering शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, असेही निवेदनात नमूद आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली WCL, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार विभाग आणि ITI संस्थांची एकत्रित बैठक घेऊन Apprenticeshipसाठी वार्षिक लक्ष्य ठरवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संतोष पारखी यांनी सांगितले की चंद्रपूरच्या औद्योगिक विकासात स्थानिक नागरिकांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षणाची संधी मिळायला हवी. "चंद्रपूरच्या जमिनीतून कोळसा निघतो, प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आणि रोजगाराच्या संधी मात्र बाहेरच्या लोकांना मिळत असतील, तर हा प्रश्न गंभीर आहे. WCL आणि MIDCमधील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना Apprenticeshipच्या संधी द्याव्यात," असे ते म्हणाले.

या मागण्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढू, असा इशाराही संतोष पारखी यांनी दिला.

या निवेदनाच्या प्रती कौशल्य विकास आयुक्त नवी मुंबई, BOAT मुंबई, WCLचे महाव्यवस्थापक आणि जिल्हा उद्योग केंद्राकडेही पाठवण्यात आल्या आहेत. स्थानिक तरुणांना प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी प्रशासन, WCL आणि जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ