मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

बुलढाण्यातील अमडापुरात पावसाअभावी सोयाबीन, तूर करपली; शेतांमध्ये पंचनामे सुरू

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व तुरीचे मोठे नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने बुधवारपासून तालुक्यात सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत.

बुलढाण्यातील अमडापुरात पावसाअभावी सोयाबीन, तूर करपली; शेतांमध्ये पंचनामे सुरू
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

बुलढाणा तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून महसूल व कृषी विभागाने बुधवारपासून तालुक्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत. अमडापूर परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता सोयाबीनच्या शेंगा पोकळ, तूर खुंटलेली आणि पिके करपलेली असे विदारक चित्र दिसले.

पंचनामे खरोखर शेताच्या बांधावर होतात की फक्त कागदोपत्री, हे तपासण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अमडापूर परिसरातील वेगवेगळ्या शेतांना भेट देण्यात आली. यावेळी अमडापूर भाग एकचे ग्राम महसूल अधिकारी गणेश खोडवे, भाग दोनचे राहुल जाधव, भाग तीनचे भूषण काळे, सहायक कृषी अधिकारी योगेश सरोदे आणि सुषमा गई, ग्रामपंचायत अधिकारी शरद काळे, उपसरपंच प्रशांत पाखरे, राम जाधव, गणेश माळोदे, राम देशमुख, भागवत सोनुने, माधव धंदाळे, प्रताप कौसे आदी उपस्थित होते. हाताशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, आणि पंचनाम्यांमुळे त्यांना नुकसानभरपाईची अपेक्षा आहे.

काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने त्यांनी पिके वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी पिके वरवर हिरवीगार दिसतात. तरीही सोयाबीनच्या शेंगांमधील दाणे बारीक आणि कमकुवत आहेत. अशा क्षेत्रातून एकरी जास्तीत जास्त तीन पोती सोयाबीन उत्पादन मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. रात्रीच्या वेळी कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार जळणारी रोहित्रे यामुळे सिंचनातही अडथळे आले. पाण्याची सोय असूनही अपेक्षित उत्पादन हाती आले नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अमडापूर भाग तीनमधील गट क्रमांक ११८५ मध्ये शेतकरी साहेबराव गवई यांनी दोन हेक्टर क्षेत्रात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. पावसाअभावी त्यांचे सोयाबीन पूर्णपणे करपले आहे. उभ्या असलेल्या मोजक्या रोपांवरील शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत, फक्त शेंगांची पापडी उरली आहे. काढणीचा खर्चही निघणार नसल्याने सोंगणी करणे परवडणारे नाही, त्यामुळे पिकावर नांगर फिरवण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी व्यथा गवई यांनी मांडली.

भाग दोनमधील गट क्रमांक २०११ मध्ये शेतकरी शाम बन्सी मानकर यांनी ५ हेक्टर १९ आर क्षेत्रात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली होती. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती देताना मानकर यांना अश्रू अनावर झाले. "साहेब, आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा आणि नुकसानभरपाई मिळवून द्या," अशी आर्त मागणी त्यांनी केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ