बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
08:10  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकने महिलेला चिरडले, दिवाळीच्या खरेदीला निघाले होते कुटुंब 00:10  नागपूरच्या गोधनी रोडवर भरधाव टिप्परने महिलेला चिरडले, मूल जखमी; २० दिवसांत दुसरा बळी 15:40  नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदायला बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सुधारित आदेश 09:57  नागपूर जिल्ह्यात नवे बोअरवेल खोदायला आणि जुने बोअरवेल खोल करायला पुढच्या आदेशापर्यंत मनाई 3 नोव्ह | 20:23  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकच्या धडकेत अश्विनी फलके यांचा जागीच मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको 16:14  हिंगण्यात २८ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा शेतात कुजलेला मृतदेह सापडला, मृत्यूचे गूढ कायम
सर्व थेट अपडेट

'बंधू'मध्ये मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे पहिल्यांदाच बहिणी म्हणून एकत्र

'बंधू'मध्ये मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे पहिल्यांदाच बहिणी म्हणून एकत्र छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

येत्या २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'बंधू' चित्रपटात दोन कसलेल्या अभिनेत्री पडद्यावर सख्ख्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बहिणींचं नातं कधी मैत्रीचं असतं, कधी भांडणाचं, तर कधी न बोलताही एकमेकींच्या मनाचा ठाव घेणारी हक्काची साथ असतं. हेच नातं जवळून अनुभवण्याची संधी 'बंधू' या आगामी मराठी चित्रपटातून मिळणार आहे. मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे या दोन कसलेल्या अभिनेत्री या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर येत असून, त्या बहिणींच्या भूमिकेत दिसतील.

'बंधू' येत्या २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. रजत बेदी यांनी हा चित्रपट सादर केला असून, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने तो साकारला आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केलं आहे.

चित्रपटाची कथा भावाभोवती फिरते, पण त्यातल्या वेगवेगळ्या नात्यांचं भावविश्वही तितकंच महत्त्वाचं आहे. या भावविश्वात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे यांनी एकमेकींसोबत उभं केलेलं सख्ख्या बहिणींचं नातं खास ठरणार आहे. छोट्यामोठ्या कुरबुरींपासून एकमेकींच्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देण्यापर्यंतचे या नात्यातले हळवे क्षण आणि भावनिक गुंतवणूक चित्रपटात उलगडणार आहे. दोघींच्या अभिनयातून एकमेकींबद्दलची आपुलकी आणि समजूतदारपणा याचा सुंदर अनुभव नक्की मिळेल.

मृण्मयी देशपांडे सांगते, की 'बंधू' ही फक्त दोन भावांची गोष्ट नाही, तर कुटुंबातल्या नात्यांमधलं प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक गुंतवणूक उलगडणारी कथा आहे. चित्रपटातलं बहिणींचं नातं अतिशय आपुलकीचं आणि हळवं आहे. स्मिताताईंसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा अनुभव खूप छान होता. एकमेकींच्या भावना समजून घेत हे नातं पडद्यावर साकारताना एक वेगळीच केमिस्ट्री अनुभवायला मिळाली. हे नातं प्रेक्षकांनाही नक्कीच भावेल, अशी आशा आहे, असं ती म्हणते.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता तांबे म्हणतात, "बहिणीचं नातं खूप खास असतं. या नात्यात प्रेम असतं, भांडणं असतात, एकमेकींची काळजी असते आणि अनेकदा न बोलताही एकमेकींच्या मनातलं ओळखण्याची ताकद असते. 'बंधू'मधून हे नातं साकारताना त्यातल्या वेगवेगळ्या भावनांशी जोडून घेता आलं, याचा मला खूप आनंद आहे. हे नातं पडद्यावर साकारताना त्यातला हळवेपणा आणि आपलेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे."

चित्रपटातलं 'बंधू रामाचा' हे पाळणागीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. निरागस प्रेमाची भावस्पर्शी अनुभूती देणारं हे गीत ऐकणाऱ्यांना एका सुरेल भावविश्वात घेऊन जाणार आहे. या गाण्यात मृण्मयी आणि स्मिता दिसणार आहेत. गाण्याचे शब्द वैभव देशमुख यांनी लिहिले असून, विजय नारायण गवंडे यांनी त्याला संगीत दिलं आहे. अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजामुळे हे पाळणागीत आणखीनच श्रवणीय झालं आहे. चित्रपटातल्या गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.

दोन कसलेल्या अभिनेत्रींचा सहजसुंदर अभिनय आणि बहिणींच्या नात्यातले भावनिक पदर यांमुळे 'बंधू'मधली ही बहिणींची जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ