गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

विधान परिषद निकाल: शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट 100 टक्के, भाजपचा 33.33 टक्के

विधान परिषद निकाल: शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट 100 टक्के, भाजपचा 33.33 टक्के छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

विधान परिषदेच्या पाचही जागांचा निकाल जवळपास 45 तासांनी स्पष्ट झाला असून, कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या, त्यावरून त्यांचा स्ट्राईक रेट समोर आला आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांचे चित्र जवळपास 45 तासांनी स्पष्ट झाले आहे. पाचही मतदारसंघांचे निकाल आता समोर आले असून, या पाचपैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने आणि 2 जागांवर महायुतीने विजय मिळवला.

मतदारसंघनिहाय निकाल असा आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक जिंकले. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण 2 जागा लढवल्या आणि त्या दोन्ही जिंकल्या. त्यामुळे या पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. या दोन जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि पुणे पदवीधर.

भाजपने पाचपैकी 3 जागांवर उमेदवार दिले होते. नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे ते तीन मतदारसंघ. या तिन्ही जागांपैकी भाजपला फक्त एकच जागा जिंकता आली, ती म्हणजे पुणे शिक्षक. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला. पुणे पदवीधरमध्येही भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव झाला. त्यामुळे भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट फक्त 33.33 टक्के राहिला.

शिंदेंच्या शिवसेनेने 5 पैकी 2 जागा लढवल्या. यात पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक या मतदारसंघांचा समावेश होता. अमरावती शिक्षकमध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला, तर पुणे शिक्षकमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव झाला. दोनपैकी एक जागा मिळाल्याने शिवसेनेचा स्ट्राईक रेट 50 टक्के आहे.

काँग्रेसनेही 5 पैकी 2 जागा लढवल्या. नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक हे ते दोन मतदारसंघ. नागपूर पदवीधरमध्ये अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला, तर अमरावती शिक्षकमध्ये काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसचाही स्ट्राईक रेट 50 टक्के आहे.

थोडक्यात, भाजपने 3 जागा लढवून 1 जिंकली. शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी 2 जागा लढवून 1 जागा जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) याने 2 जागा लढवून दोन्ही जिंकल्या.

#पुणे#सियासत#PT24#Politics#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ