बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
11:20  पुणे शिक्षक मतदारसंघात आसगावकर बाद, भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांचा मार्ग सुकर 00:00  आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू 27 ऑक्ट | 18:20  पुणे पदवीधर मतमोजणीत गोंधळ: सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप, हर्षदा देशमुख आक्रमक 13:41  पुणे महापालिका फिनलंडसोबत पाणी व्यवस्थापन आणि तरुणांच्या कौशल्यासाठी भागीदारीच्या शक्यता तपासणार 12:55  पुणेकरांना दिलासा: जादा पाणीकपात सध्या नाही, दर गुरुवारी १० टक्के कपात कायम 01:41  पुणे शिक्षक मतदारसंघ: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर, शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर
सर्व थेट अपडेट

अजित पवारांच्या विमान अपघाताला ९ महिने; जय पवार पुण्यात सीआयडी कार्यालयात

अजित पवारांच्या विमान अपघाताला ९ महिने; जय पवार पुण्यात सीआयडी कार्यालयात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला, याची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जय पवार थोड्याच वेळात पुणे सीआयडी कार्यालयात जाणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जय पवार थोड्याच वेळात पुणे सीआयडी कार्यालयात जाणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला ९ महिने उलटून गेले आहेत. त्यांच्या विमान अपघाताचा तपास गेल्या ९ महिन्यांत कुठपर्यंत आला, याची माहिती जय पवार घेणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज ९ महिने पूर्ण होत आहेत.

अजितदादांच्या निधनाला ९ महिने उलटून गेले, तरी या अपघाताचे गूढ अजूनही उकललेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे, पण तपासातील कोणतीही नवी माहिती समोर येत नसल्याने अजितदादांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अशा परिस्थितीत सीआयडी जय पवार यांना काय माहिती देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जय पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन त्याबाबतचे पुरावे सादर केले होते. तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणी आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती. गुन्हा दाखल करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता, पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला नव्हता.

याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली होती. मात्र आजपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलेले नाही. ते सीआयडीकडेच सोपवण्यात आलेले आहे.

यावरून विरोधकांनी अजितदादा गटावर वारंवार हल्ला चढवला होता. सत्तेत असूनही अजितदादांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीबाबत अनास्था दिसत आहे आणि अजित पवार यांचे कुटुंबीय या अपघातावर काहीच बोलत नाहीत, अशी टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज जय पवार सीआयडी कार्यालयात जात असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ