सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 09:59 IST

सूरज चव्हाणच्या घरी दसऱ्याला लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली राधाची झलक

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण याने दसऱ्याच्या मुहूर्तावर लाडक्या लेकीला घरी आणलं. स्वागताचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सूरज चव्हाणच्या घरी दसऱ्याला लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली राधाची झलक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) बाबा झाला आहे आणि त्याच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सूरजने आपल्या लाडक्या लेकीला घरी आणलं आणि तिचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केलं. या स्वागताचा व्हिडीओ त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात जन्माष्टमीच्या दिवशी गोडगोडुली राधा आली. बाळाच्या जन्मानंतर सूरजच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही चिमुकली आजोळी गेली होती. आता दीड महिन्यांनी ती आपल्या वडिलांच्या, म्हणजेच तिच्या हक्काच्या घरी परतली आहे. त्यामुळे सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

बाळाच्या स्वागतासाठी घरात फुलांच्या रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. संपूर्ण घर फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलं होतं. सूरजने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओत त्याच्या गोड बाळाची झलकही पाहायला मिळते. दसऱ्याचं औचित्य साधून त्याने चिमुकलीचं घरी थाटामाटात स्वागत केलं. "माझी लाडाची लक्ष्मी आली सोन पावली", असं कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सूरज बाबा झाल्याचं कळल्यापासूनच चाहत्यांना त्याच्या लेकीची एक झलक पाहण्याची उत्सुकता होती. आता लेकीचं घरी मोठ्या थाटामाटात स्वागत झालं असून, या सोहळ्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांची ती उत्सुकता पूर्ण झाली आहे.

डिसेंबर 2025 मध्ये सूरज चव्हाणचं लग्न संजना हिच्याशी झालं होतं. काही दिवसांपूर्वी सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने संजनाच्या चोर ओटीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळेच सूरज आणि संजना आई-बाबा होणार, ही बातमी समोर आली. त्यानंतर सूरज आणि संजना यांनी स्वतः ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. संजनाने बेबी बंपसह काही व्हिडीओही शेअर केले होते.

तसेच, काही दिवसांपूर्वी संजनाचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं. मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने स्वतः जातीने लक्ष घालून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सूरजला मुलगी झाल्याचं समजताच जान्हवी धावतच बाळाला पाहण्यासाठी आली होती. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ