दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासाठी 'झिरो चलन'; 2.40 लाख अर्ज दाखल
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क न भरता अर्ज करता यावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 'झिरो चलन' सुविधा सुरू केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशांअभावी अडू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरताना या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाणार नाही. त्यासाठी अर्जाच्या प्रक्रियेत 'झिरो चलन' हा पर्याय देण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता 'झिरो चलन' सुविधेतून आपले परीक्षा अर्ज भरले आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, म्हणून त्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा आणि अंमलबजावणी सुरळीत व्हावी, यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभाग या पातळ्यांवर आवश्यक यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. विभाग या कामाचा सतत आढावा घेत आहे.
'झिरो चलन' पर्यायामुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न भरता अर्ज दाखल करता येत आहेत. तसेच सर्व विद्यापीठांनी शुल्कमाफीच्या अंमलबजावणीबाबत परिपत्रके काढली आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी याआधीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते परत करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील कोणताही पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नये आणि लाभ घेताना त्याला अडचण येऊ नये, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
शुल्कमाफीबाबत किंवा अर्जाबाबत काही शैक्षणिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाशी किंवा जनसंपर्क अधिकारी, विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
मुंबई विद्यापीठात डॉ. पूजा रौंदळे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांचा क्रमांक 9322020589 आहे, तर लीलाधर बनसोड (जनसंपर्क अधिकारी) यांचा 9833969977 आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी डॉ. राजेंद्र तलवारे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ) 9890642431, डॉ. सविता कुलकर्णी (विद्यार्थी विकास संचालक) 7720036774 आणि अजय ठुबे 7588169134 यांच्याशी संपर्क साधता येईल.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे डॉ. अजितसिंग एन. जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ) 9545595999 आणि अलोक जत्राटकर (विद्यार्थी विकास संचालक) 8698928080 हे संपर्कासाठी आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. अंधारे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ) 9975055155 आणि डॉ. काळवणे (विद्यार्थी विकास संचालक) 7020634502 यांच्याशी बोलता येईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.