बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
00:00  आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू 27 ऑक्ट | 18:20  पुणे पदवीधर मतमोजणीत गोंधळ: सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप, हर्षदा देशमुख आक्रमक 04:09  मुळा-मुठा नदीत पावसाळ्यानंतरही प्रदूषणाचा परिणाम कायम, आघारकर संस्थेच्या अभ्यासात उघड 01:41  पुणे शिक्षक मतदारसंघ: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर, शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर 09:39  विधान परिषद मतमोजणी 24 तासांनंतरही सुरू; शिक्षकमध्ये गावडे पुढे, पदवीधरमध्ये हर्षदा जाधव कोट्याजवळ 07:23  विधान परिषद निकाल: मतमोजणी अजूनही सुरूच, ३ जागांवर मविआ तर २ जागांवर महायुती आघाडीवर
सर्व थेट अपडेट

पुणे शिक्षक मतदारसंघात बिचुकले बाद, फक्त 19 मतं; पदवीधरमध्ये अजून रिंगणात

पुणे शिक्षक मतदारसंघात बिचुकले बाद, फक्त 19 मतं; पदवीधरमध्ये अजून रिंगणात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कुणालाही नडू शकतो, असं म्हणणाऱ्या डॉ. अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघात फक्त 19 मतं मिळाली आणि ते बाद झाले. पुणे पदवीधरमध्ये मात्र त्यांचं आव्हान कायम आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. अभिजीत बिचुकले यांना फक्त 19 मतं मिळाली आणि ते स्पर्धेतून बाद झाले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी कुणालाही नडू शकतो, असं ते म्हणाले होते. निवडणुकीला उभं राहिल्यावर त्यांनी पदवीधरांना मोठी आश्वासनंही दिली होती.

बिचुकले यांनी पुणे शिक्षक मतदारसंघ आणि पुणे पदवीधर अशा दोन्ही निवडणुकांसाठी फॉर्म भरला होता. शिक्षक मतदारसंघात ते बाद झाले असले, तरी पुणे पदवीधरमध्ये त्यांचं आव्हान अजून कायम आहे. आता शिक्षक मतदारसंघात बाद झालेले बिचुकले पदवीधरमध्ये तरी विजय मिळवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अंतिम 30 उमेदवारांची यादी निश्चित झाली होती. त्यात विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार होते. नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे अभिजीत बिचुकलेही या पात्र उमेदवारांच्या यादीत होते. पण पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच फक्त 19 मतांमुळे त्यांच्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली.

शिक्षक मतदारसंघात एलिमिनेशन राउंडमध्ये एकूण 19 उमेदवार बाद झाले असून, त्यात बिचुकले यांचं नाव आहे. आतापर्यंतच्या मोजणीत कौस्तुभ गावडे यांना 17 हजार 600 मतं मिळाली आहेत. सचिन सानप यांना 11 हजार 328, दत्तात्रय सावंत यांना 10 हजार 377, तर जयंत आसगावकर यांना 8 हजार 350 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघाचा कोटा 25 हजार 756 इतका आहे. त्यामुळे निकालासाठी आणखी बराच वेळ वाट पाहावी लागणार, हे नक्की.

पुणे पदवीधरची स्थिती काय आहे? पहिल्या फेरीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 12 हजार 400 मतं मिळाली आहेत. स्मित जाधव यांना 1 लाख 2 हजार मतं मिळाली आहेत. पदवीधरसाठी कोटा 1 लाख 13 हजार 113 ठरला आहे आणि हर्षदा जाधव यांना तो पूर्ण करण्यासाठी 716 मतांची आवश्यकता आहे.

फॉर्म भरल्यानंतर बिचुकले काय म्हणाले होते? निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर अभिजीत बिचुकले म्हणाले होते, की शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी कुणालाही नडू शकतो. माझी कोणतीही टेस्ट केली तर मी निर्व्यसनी आहे, हेच पुढे येईल, असंही ते म्हणाले. शिक्षक काय करतात, हे आम्हालाही चांगलं माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

पदवीधरांनी मला निवडून दिलं, तर तुम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागणार नाही, असं बिचुकले म्हणाले होते. तुमचे लीडर लेचेपेचे आहेत, लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा, असंही त्यांनी म्हटलं होतं. मला विजयी केलं तर मी देवाभाऊंच्या नाकीनऊ आणेन, असंही ते म्हणाले होते. माझं एकच ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे, मी उभा राहिलो तर सरकारपेक्षा मोठा, असं म्हणत पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी इतर उमेदवारांना आव्हान दिलं होतं.

#पुणे#सियासत#PT24#Politics#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ