बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
00:00  आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू 27 ऑक्ट | 18:20  पुणे पदवीधर मतमोजणीत गोंधळ: सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप, हर्षदा देशमुख आक्रमक 27 ऑक्ट | 20:07  पुणे पदवीधर मतमोजणी दुपारी चारनंतर वेग घेण्याची शक्यता, पहिले कल संध्याकाळी 01:41  पुणे शिक्षक मतदारसंघ: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर, शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर 03:55  बाणेरमध्ये परवानगीशिवाय रस्ते खोदल्याचा आरोप, पीएमसीने मालपाणी ग्रुपला ठोठावला 5.48 कोटींचा दंड 03:40  पुण्याचा वाहतूक पोलीस नितीन शिंदे तेलंगणात 12 किलो गांजासह पकडला, आयुक्तांकडून निलंबन
सर्व थेट अपडेट
AQI 93 | Satisfactory 04:09 IST

पुना वेस्टर्न क्लब करंडक: राजस्थान रॉयल ॲकॅडमीचे सलग दोन विजय, फराटेची नाबाद ७३

१३ वर्षांखालील मुलांच्या टी-२० स्पर्धेत राजस्थान रॉयल ॲकॅडमीने लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीला ६८ धावांनी आणि स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीला ८९ धावांनी हरवले.

पुना वेस्टर्न क्लब करंडक: राजस्थान रॉयल ॲकॅडमीचे सलग दोन विजय, फराटेची नाबाद ७३ छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

डीजेएसजी क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पोर्ट्‌स व्हेंचर यांनी मिळून आयोजित केलेल्या 'पुना वेस्टर्न क्लब करंडक' आंतरक्लब १३ वर्षांखालील मुलांच्या टी-२० स्पर्धेत राजस्थान रॉयल ॲकॅडमी (पुणे) संघाने जोरदार सुरुवात केली आहे. या संघाने सलग दोन सामने जिंकून पुढे वाटचाल केली.

भुगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब (पीडब्ल्युसी) मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीचा ६८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून राजस्थानने आधी फलंदाजी घेतली आणि १८ षटकांत ४ बाद १८० धावा केल्या.

या डावात विराज फराटे याने ३७ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७३ धावांची आक्रमक खेळी केली. वर्धन कुमारने ३९ धावा आणि आर्यन उचित याने ३४ धावा करून त्याला चांगली साथ दिली. लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीकडून ओम बुरके याने एक गडी बाद केला.

उत्तरादाखल लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत ११२ धावांवर बाद झाला. ओम बुरके आणि अवनीश कुलकर्णी यांनी प्रत्येकी २१ धावा केल्या. राजस्थानच्या अर्जुन मिश्रा (२/१), अनिरूध्द शिवकुमार (२/४) आणि संचित कुमार (२/१७) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून भेदक मारा केला. विराज फराटे सामनावीर ठरला.

दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स् ॲकॅडमीने स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. आधी फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१५ धावा उभारल्या.

या डावात भुजंग धुलगुंड याने अवघ्या ४४ चेंडूंत ७ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर ९५ धावांची वादळी खेळी केली. रणवीर मालवडकर याने ४६ चेंडूंत ६४ धावांचे मोलाचे योगदान दिले, तर विनायक जाधव याने २३ धावा केल्या. स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीकडून यश गायकवाड याने ३७ धावांत ४ गडी बाद केले.

२१६ धावांचे आव्हान पेलताना स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १४.२ षटकांत फक्त १२६ धावांवर संपला. विहान कार्डेकर याने ४४ आणि यश गायकवाड याने २९ धावा केल्या, पण त्यांचा प्रतिकार अपुरा पडला. राजस्थानकडून अर्यमन पाविया याने ३ धावांत ३ गडी टिपले, तर सदगुरू रेड्डी (२/२१) आणि विनायक जाधव (२/२४) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भुजंग धुलगुंड या सामन्याचा सामनावीर ठरला.

गटसाखळी फेरीतील या दोन्ही विजयांमुळे राजस्थान रॉयल ॲकॅडमीचा संघ स्पर्धेत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. फलंदाजांची धडाकेबाज खेळी आणि गोलंदाजांचा अचूक मारा, या दोन्ही जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होऊ दिले नाही.

#पुणे#PT24#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ