सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 09:22 IST

नाशिकमध्ये राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडलेल्या ३० वर्षीय महिला वकील शितल दीपक नरूले यांचा सिडको भागातील राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

नाशिकमध्ये राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नाशिकमधील सिडको भागात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि. २३) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ३० वर्षीय महिला वकील शितल दीपक नरूले यांचा जागीच मृत्यू झाला. त्या नवीन नाशिकमधील शुभम पार्क येथे राहत होत्या.

राज्यात आणि देशभरात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत, आणि रोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुण महिला वकिलाचा प्रवास महामार्गावरील उड्डाणपुलावर अचानक थांबला.

शितल या शुक्रवारी सकाळी आपल्या मोपेडवरून (एमएच १५ एफएल ९५९०) न्यायालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. हॉटेल स्नेहींतसमोरील उड्डाणपुलावरून जात असताना एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्या धडकेमुळे त्या रस्त्यावर आदळल्या. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा धक्का बसला.

अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. ही संतापजनक बाब असल्याने तिथे जमलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला आणि चालकाला द्वारका येथे पकडले.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, ती पोलिसांनी लगेच सुरळीत केली. नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पळून गेलेल्या चालकाला द्वारका परिसरात पकडता आले. त्याला ट्रकसह अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास आणखी एक भीषण अपघात झाला. काँक्रीटीकरणाचे काम संपवून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मजुरांची पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले.

मृत झालेल्या मजुरांपैकी तीन जण पश्चिम बंगालचे आहेत, तर एक जण बिहार राज्यातील रहिवासी आहे. गंभीर जखमी झालेल्या मजुरांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ