सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 09:59 IST

कुशल बद्रिकेंच्या रागानंतर अथर्व सुदामेचा व्हिडीओ, कांदेपोह्यांवरून माफी आणि कार्यक्रमाची घोषणा

घरी बोलावून अपमान केल्याचा आरोप कुशल बद्रिकेंनी केल्यानंतर अथर्व सुदामेनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून माफी मागितली आणि 9 नोव्हेंबरला पुण्यात कार्यक्रम ठेवल्याचं सांगितलं.

मराठी अभिनेता कुशल बद्रिके यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याची त्यात तक्रार केली होती. 'चला हवा येऊ द्या' मधून लोकांना माहीत असलेले कुशल त्या व्हिडीओत खूप चिडलेले दिसत होते. अथर्वनं घरी बोलावून अपमान केला, असा त्यांचा आरोप होता. आता अथर्वनं स्वतःचा व्हिडीओ शेअर करून त्यावर उत्तर दिलं आहे.

कुशल बद्रिके व्हिडीओत म्हणाले होते, "नमस्कार, हा व्हिडीओ मी करतोय, कारण इतक्या वर्षात मला कधी असा वाईट अनुभव आलेला नाही. पहिल्यांदाच असा एक अनुभव आलाय की, अथर्व सुदामे हा जो कंटेट क्रिएटर आहे, त्यानं सगळ्या कलाकारांना घरी बोलावलं आणि सांगितलं की, या सुदामेंकडे कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळे गेलो, पण एकालाही त्यानं काही कांदेपोहे दिलेले नाहीत... आम्ही सगळे हौशेनं गेलेलो की, चला सुदाम्यांचे कांदेपोहे खाऊयात... पण एकालाही कांदेपोहे मिळालेले नाहीत..."

ते पुढे म्हणाले, "तू व्हिडीओवर अपमान करतोस, तिथपर्यंत ठिक आहे, पण बोलावून लोकांचा अपमान करतोयस, हे काही मला पटलेलं नाही, आणि माझा आक्षेप आहे या गोष्टीला अथर्व... बाकी कलाकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रिअॅक्ट करतील, पण मला नाही आवडलंय हे... सॉरी..."

यानंतर अथर्व सुदामे यानं इन्स्टाग्रामवर माफी मागतानाचा व्हिडीओ टाकला. तो म्हणाला, "नमस्कार मित्रांनो, मी हा व्हिडीओ याकरिता बनवतोय की, मला माफी मागायची आहे. मी कलाकारांना घरी बोलावलं आणि त्यांना साधे कांदे-पोहेसुद्धा खायला घालू शकलो नाही. त्यामुळे कलाकार माझ्यावर चिडलेत, लोक पण माझ्यावर चिडलेत, मला म्हणाले, सुदामे हे काय बरोबर नाही, तुम्ही घरी बोलावता आणि साधे कांदे-पोहे खायला घालत नाहीत... त्याकरिता मी एक आयडिया केली आहे..."

ही आयडिया म्हणजे एक कार्यक्रम आहे, असं अथर्वनं पुढे सांगितलं. तो म्हणाला, "मी 'सुदाम्यांचे कांदे पोहे' हा कार्यक्रमच ठेवला आहे. फक्त कलाकारांसाठी नाही तर तुम्हा सगळ्यांसाठी हा कार्यक्रम मी ठेवलेला आहे. 9 नोव्हेंबरला पुण्यात, बालगंधर्व रंगमंदिरला हा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागतील..."

अथर्वच्या या पोस्टखाली चाहत्यांनी कमेंट्स करून कार्यक्रमाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

अथर्वनं व्हिडीओतून दिलेल्या स्पष्टीकरणानंतर असं दिसतं की, कुशल बद्रिके यांचा व्हिडीओ म्हणजे गंमतीनं केलेलं अथर्वच्या कार्यक्रमाचं प्रमोशन होतं. त्यावर अथर्वनंही व्हिडीओ शेअर करून कार्यक्रमाची माहिती दिली आणि गंमतीनं माफीही मागितली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ