शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पवारांच्या तब्येतीची मोदींकडून विचारपूस; राऊत म्हणाले, आजारपणातही राजकारण

पवारांच्या तब्येतीची मोदींकडून विचारपूस; राऊत म्हणाले, आजारपणातही राजकारण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोन केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने ते पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार घेत होते. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून तब्येतीची चौकशी केली.

"तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू. काळजी करू नका. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत बरे व्हा," असे मोदी यांनी पवारांना म्हटले. या फोनमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पवार एनडीएसोबत जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मोदी आजारपणातही राजकारण करतात आणि संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात, अशी टीका त्यांनी केली.

राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पण ते एक खोटारडे गृहस्थ आहेत. त्यांनी शरद पवारांना फोन केला. लालू यादवही आजारी आहेत. लालू यादव मोठे नेते आहेत. शरद पवारही मोठे नेते आहेत. लालू यादवांना का फोन करत नाही?" तसे असेल तर पंतप्रधानांनी देशातील सर्व प्रमुख नेत्यांची चौकशी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. मोदी सोयीच्या आजारपणाचीच चौकशी करतात आणि त्यात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करून संभ्रम निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला. आजारपणाच्या चौकशीतही राजकारण करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे, असा सवालही त्यांनी केला. मोदींनी कितीही फासे टाकले तरी शरद पवार आणि त्यांचा पक्ष मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

जगभरात सत्तांतराचे वारे वाहत आहे, असे सांगत राऊत यांनी मोदी एप्रिलमध्ये पायउतार होणार असल्याचा दावा केला. "मोदी एप्रिल-मेमध्ये जातील. मी सहा महिने आधीपासून हे म्हणतोय. देवेंद्र फडणवीस सुद्धा जाणार आहेत," असे ते म्हणाले. मोदी आणि शाह यांच्या विरोधात त्यांचेच लोक उभे राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटले.

अमेरिकेच्या निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केले. ट्रम्प आणि मोदी यांच्यात साम्य आहे, ट्रम्प, मोदी आणि नेतन्याहू हे त्रिकूट आहे, असे त्यांनी म्हटले. अमेरिका युद्धात का उतरला, याचे उत्तर जनता शोधत आहे. जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारले आहे, सर्वधर्मियांचा विजय झाला आहे आणि टोकाची धर्मांधता कुठेच चालत नाही, अशी टीका त्यांनी केली.

गोकूळवर चार संचालक नेमण्यात आले आहेत, त्यावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. ही सरकारला आलेली मस्ती आहे, असे ते म्हणाले. बहुमत डावलून जे पराभूत झाले आहेत, त्यांच्या हातात गोकुळ देऊन ते गुजरात लॉबीला विकायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. यांना लोकशाहीची चाड नाही. लोकभावना दडपून स्वतःची सत्ता यावी म्हणून चार संचालक नेमणे याला चरबी म्हणतात, असे ते म्हणाले. लोकशाही मार्गाने आलेले पॅनेल चालत नाही का, असा प्रश्न विचारत लोक रस्त्यावर येतील, असा इशारा त्यांनी दिला. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल मानत नसतील तर काय, पराभव स्वीकारावा लागेल, असे सांगतानाच गोकुळ वाचवण्यासाठी मविआने एकत्र आले पाहिजे, असे राऊत म्हणाले. फडणवीस यांना किंमत मोजावी लागेल आणि अमित शहांची झुंडशाही मोडून काढली पाहिजे, असेही ते म्हणाले.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ